लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Sonu Nigam : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘आधुनिक रफी’
सॅड सॉंग असो किंवा उडत्या चालीचं गाणं असो… भावगीत असो किंवा देशभक्तीपर गीत असो… सोनू निगम (Sonu Nigam) यांच्या आवाजातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांना भावलंच…. लहानपणापासूनच मोहम्मद रफी (Mohamamd Rafi) यांच्या गाण्यांची आवड असणाऱ्या सोनू यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गायनाचा प्रवास सुरु केला होता… पहिल्यांदाच स्टेजवर जेव्हा त्यांनी गाणं गायलं तेच रफी यांचं ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं गायलं होतं. त्यांच्या गाण्याची सुरुवात वडिल आगम कुमार निगम यांच्यासोबत स्टेज शो, पार्ट्या आणि फंक्शन्समध्ये झाली होती… सोनू निगम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊयात काही इंटरेस्टिंग गोष्टी…(Bollywood News)

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी ९०च्या दशकापासून आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. १९७३ मध्ये फरीदाबाद येथे जन्मलेल्या सोनू निगमने आपल्या आवाजाच्या जादूने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान मिळवलं आहे. सोनू यांना गाण्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला… सोनू निगम यांच्यावर बालपणापासूनच ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गायनाचा प्रभाव होता… सुरुवातीच्या काळात सोनू यांनी मोहम्मद रफी यांचीच गाणी गायली होती… कालांतराने त्यांनी उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. (Entertainment)
================================
=================================
वयाच्या १९ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये गायक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनु निगम यांचं पहिलं गाणं ‘आजा मेरी जान’ (१९९३) या चित्रपटाची ओ आसमावाले हे होतं… त्यानंतर ‘मुकाबला’, ‘शबनम’, ‘खुद्दार’, ‘और प्यार हो गया’, ‘दिल चाहता है’, ‘साथिया’, ‘वीर-झारा’ अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली… गायन, सुत्रसंचालन, संगीतकार यासोबतच सोनु निगम यांनी अभिनय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे…१९८३ मध्ये आलेल्या ‘बेताब’ चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून कामं केलं होतं… केवळ चित्रपटांमध्येच गाणी न गाता सोनू निगम यांनी मराठी, हिंदी भावगीते आणि भीमगीते देखील गायली आहेत… निगम यांनी संगीतकार म्हणूनही योगदान दिले आहे आणि ‘सिंह साब द ग्रेट’, ‘जल’, ‘हॅपी ऍनिव्हर्सरी’, ‘तुम जो मिल गये हो’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिले आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi