Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

Sholay चित्रपटावेळी जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती ‘ही’ गुड न्यूज!
१९७५ साली आलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (Sholay Movie) चित्रपटाला या वर्षी रिलीज होऊन ५० वर्ष झाली आहेत… कितीही नवे चित्रपट आले तरी शोले चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही आहे… चित्रपटाची कथा, कलाकारांची कामं, डायलॉग्ज्स सारं काही इतकं अप्रतिम होतं की प्रेक्षक आजही ‘शोले’ विसरु शकले नाही आहेत… मात्र, शोले चित्रपटावेळी जया आणि अमिताभ बचच्न यांच्या जीवनात एक सर्वात मोठी गोष्ट घडली होती हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात…(Iconic Bollywood Movie)

तर, शोले चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादूरी (बच्चन), हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या… या चित्रपटाच्या २ वर्षांपूर्वी जया भादूरी आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं होतं… चित्रपटात जया यांनी राधा हे पात्र साकारलं होतं जी विधवा होती… इंटरेस्टिंग बाब म्हणजे शोले चित्रपटाच्या शुटींगवेळी चक्क जया बच्चन ४ महिन्यांच्या गरोदर होत्या… जवळपास अडीच-तीन वर्ष सुरु असणाऱ्या शोलेच्या शुटींगनंतर जया यांनी मुलगी शेव्ता हिचा जन्म दिला होता… शोले चित्रपट हा खरं तर बऱ्याच कारणांमुळे लक्षात राहण्यासारखा आहे… जय-वीरूची भन्नाट जोडी आणि मैत्री, गब्बरपासून ते धन्नो आणि कालियापर्यंत चित्रपटातील प्रत्येक पात्र, गाणी ही जगप्रसिद्ध आहेत. (Bollywood News)
================================
हे देखील वाचा: Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
=================================
‘शोले’ चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा तो फ्लॉप झाला होता… मात्र, कालांतराने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता… रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीय कूमार, अमजद खान, ए.के.हंगल, हेमा मालिनी, जया भादूरी, हसरानी, सचिन पिळगांवकर, विजू खोटे असे एकाहून एक अष्टपैलु कलाकार या चित्रपटात झळकले होते…(Sholay Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi