Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!
‘शोले’ हा फक्त एक सिनेमा नाहीये, तर प्रत्येक भारतीय सिनेमा लव्हरसाठी एक इमोशन आहे. १९७५ साली रिलीज झालेल्या शोलेने म्हणजे त्याच्या स्टोरीने, कॅरक्टर्स्, डायलॉग आणि सिनेमॅटोग्राफीने अक्षरशः भारतातच नाही, तर इंटरनॅशनल ऑडिअन्सनासुद्धा भुरळ पाडली. मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये तर शोले तब्बल पाच वर्षं चालला. १९७५ मध्ये शोले हा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला, बराच काळ रेकॉर्डवर राहिला आणि फक्त भारतातच नाही तर चक्क परदेशातसुद्धा शोलेचं कौतुक व्हायला लागलं. सोविएत युनियन, इराण सारखे देश, इतकंच काय? तर पाकिस्तानातसुद्धा शोले चांगलाच गाजला. येत्या १५ तारखेला ‘शोले’ सिनेमाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत, तर या आयकॉनिक शोले सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवी निमित्ताने या सिनेमाचा इंटरनॅशनल लेव्हलवर काय प्रभाव होता चला जाणून घेऊयात….

१९७० आणि १९८० च्या दशकात भारतीय सिनेमांना सोव्हिएत युनियनमध्ये मोठी डिमांड होती आणि ‘शोले’ हा तिथे प्रदर्शित झालेल्या भारतीय सिनेमांपैकी एक होता. तेव्हा तर कोणालाच जराही अंदाज नव्हता की, सोव्हिएत युनियनमध्ये शोले सिनेमाला भरपूर पॉप्युलॅरिटी मिळेल.. तिथे शोलेच्या पहिल्या स्क्रीनिंगला तब्बल ४८.४ मिलियन तिकिटे विकली गेली आणि शोले री रिलीज झाला त्यानंतर जवळपास ६० मिलियन तिकिटे विकली गेली. त्यामुळे झालं असं की, शोले सोव्हिएतच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या परदेशी सिनेमांपैकी शोले हा महत्त्वाचा सिनेमा ठरला, ज्याने तिथे तेव्हाच्या हॉलिवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांनाही टक्कर दिली होती.
इराणमध्ये तर आजही ‘शोले’ची क्रेझ जराही कमी झाली नाही. आजही इराणी ऑडीयन्ससाठी बॉलीवूड म्हणजे शोले अशीच ओळख आहे. जगातला सर्वात मानाचा अश्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या इराणच्या सिनेमांना समीक्षकांची भरपूर प्रशंसा मिळते, त्या इराणी ऑडीयंसवर शोले सिनेमाने खोलवर परिणाम केला. इराणी दिग्दर्शक अमीर अतहर सोहेली यांनी २०१९ मध्ये कोलकाता येथे त्यांच्या चित्रपट Women Who Run With The Wolves च्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, इराणमध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन होत नाही आणि यामुळे इराणी लोकांना बॉलिवूडची ओळख विशेष करून ‘शोले’ या चित्रपटामुळे आहे.

काही दिवसांपूर्वी तर इराणच्या मुख्य राष्ट्रीय वर्तमानपत्रात आयकॉनिक ‘शोले’ला ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याला ट्रिब्युट देण्यासाठी अख्खं पान शोलेबद्दल छापलं होतं. भारतातल्या इराण एम्बसीने आपल्या x अकाउंटवर शोलेला ५० वर्ष पूर्ण झाली आणि इराण स्टील रिमेम्बर्स अशी पोस्ट शेअर केली होती. आणखी एक इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे, इराणीयन ॲक्टर नवीद मोहम्मदझादेह याने तर गब्बर सिंह या पात्राचं इंस्पिरेशन घेतलं होतं. इतकंच नाही तर गब्बर सिंहसारखा सेम गेटप आणि सेम हावभाव एका फिल्म मध्ये कॉपीसुद्धा केलं होतं. तिथे आजही गब्बर सिंह हा जब्बर सिंह नावाने ओळखला जातो. ऐकून आश्चर्य वाटेल, पण बेंगलोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये इराणी फिल्म प्रोड्युसर शाहेद अहमदलू यांनी अभिमानाने सांगितलं, “मी शोले ५०० वेळा पाहिलाय.” आता या वरून लक्षात येईलच की, इराणमध्ये आजही शोले फिल्मची किती क्रेझ आहे!

‘शोले’ला जगातल्या क्रिटीक्सने अक्षरशः डोक्यावर घेतलं. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने २००२ मध्ये टॉप १० भारतीय सिनेमांमध्ये नंबर वन ठरवलं. २००५ मध्ये फिल्मफेअरने ५० वर्षांतील बेस्ट सिनेमा म्हणून अवॉर्ड दिला. बीबीसी इंडियाने तर याला “मिलेनियमचा सिनेमा” म्हणून निवडलं. लंडनच्या एका प्रोफेसरने जय आणि वीरूच्या रिबेलियस मॅस्क्युलिनिटीचं कौतुक केलं. काहींनी तर याला १९७५ च्या भारताचं प्रतीक आहे, असंच सांगितलं. इतकंच काय तर, पाकिस्तानातसुद्धा शोलेचं कौतुक झालं, विशेषकरून डायलॉग्सचं ते तर चांगलेच गाजले आणि गब्बर सिंगला कमालीची पॉप्युल्यारिटी मिळाली.
आताच काही दिवसांपूर्वी, जून २७ला इटलीच्या बोलोनामधील इल सिनेमा रिट्रोव्हाटो फेस्टिव्हलमध्ये शोलेचं २०४ मिनिटांचं अनकट व्हर्जन मोठ्या स्क्रीनवर दाखवलं गेलं. यात मूळ हिंसक शेवट होता, जो खूप चर्चेत आला. हे रिस्टोरेशन फिल्म हेरिटेज फाउंडेशन, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट आणि इटलीच्या एका संस्थेने मिळून केलं. यानंतर टोरंटोच्या TIFF मध्ये याचा प्रीमियर झाला.
================================
हे देखील वाचा: Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं कारण!
=================================
आता हे शोले जागतिक पातळीवर कनेक्ट होण्याचं कारण काय? तर ते म्हणजे लोकांचं म्हणणं आलं की, शोलेने भारतीय सिनेमाला “करी वेस्टर्न” ची ओळख दिली. आता करी वेस्टर्न म्हणजे काय? तर ‘शोले’ने द मॅग्निफिसेंट सेव्हन, वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्ट आणि सेव्हन समुराई अशा भारताबाहेरच्या सिनेमांमधून इन्स्पिरेशन घेतलं आणि त्याला भारतीय टच दिला. दीना होल्टझमन या ‘शोले’ मधल्या पुरुषांच्या घट्ट मैत्रीवर बोलल्या, तर झियाउद्दीन सरदार यांनी मुस्लिम आणि स्त्री पात्रांच्या जुन्या पद्धतीच्या चित्रणावर टीका केली. यामुळे एक गोष्ट कळते की, या चित्रपटाला जगभरातून वेगवेगळ्या नजरेनं बघितलं गेलं. आज अगदी पाच दशकांनंतरही शोले सिनेमाचा जलवा कमी झाला नाही. आजही शोले फिल्मचा अनुभव तितकाच ताजा आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi