‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Sholay हीट झाला आणि इंडस्ट्रीच बदलली…
कितने आदमी थे? (दो आदमी थे ज्यांनी फिल्म लिहिली… एक डायरेक्टर ज्याला स्वत:लाच माहिती नव्हतं की तो जे घडवतोय त्याने इतिहास रचला जाणार आहे आणि जे या फिल्ममध्ये काम करत होते त्यांना ही नव्हतं माहिती की या चित्रपटातील पात्रच नाही, तर निर्जीव गोष्टी सुद्धा येणाऱ्या अनेक वर्ष लक्षात ठेवल्या जातील. आता ही फिल्म कोणती आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. ज्याला पूर्ण झाले आहेत. ( “पुरे 50” samba dialogue cut) साल! ‘शोले’ या चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९७५ साल.

भारतात इमर्जन्सी लागू झाली होती. पण त्याचवेळी सिनेमागृहात शोले आला, ज्याने सगळ्या देशाला वेड लावलं. या मूवीचा प्रत्येक डायलॉग, प्रत्येक सीन प्रेक्षकांच्या मनात कोरला गेला. हा सिनेमा फक्त सिनेमा नव्हता, तर एक सांस्कृतिक क्रांती होती. चला, जाणून घेऊया ‘शोले’ने भारतीय सिनेमाला कसं बदललं आणि हा सिनेमा इतका ग्रेट का मानलं जातो? तसं बघायला गेलं तर शोलेला अॅक्शन कॉमेडी genre मध्ये मोडलं जातं. पण सलिम-जावेद या लेखक जोडीने एक अशी गोष्ट लिहिली, ज्यामध्ये अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, आणि इमोशन्सचं परफेक्ट मिश्रण होतं.
गब्बर सिंगसारखा खलनायक, ज्याची दहशत आजही लोकांच्या मनात आहे. कारण आजही (गब्बर सिंग 50-50 kos dur dialogue) जय आणि वीरूची दोस्ती, जी प्रत्येकाच्या मनाला भिडली. सिनेमातलं प्रत्येक पात्र इतकं प्रेक्षकांना जिवंत वाटलं!
दुसरी गोष्ट म्हणजे ‘शोले’ च्या अॅक्शन सीन्स. त्या काळात बॉलीवूडमध्ये इतके भव्य अॅक्शन सीन्स कधीच पाहिले नव्हते. खडकाळ डोंगरांमध्ये शूट केलेले सीन, घोड्यांचा थरार, ट्रेनवरचा हल्ला, आणि गब्बरच्या अड्ड्यावरचा शेवटची अॅक्शन हे सगळं इतकं जबरदस्त होतं की प्रेक्षक थिएटरमधून अक्षरश: हादरून बाहेर पडायचे.

‘शोले’ ने बॉलीवूडला ‘करी वेस्टर्न’ नावाचा नवा जॉनर दिला, ज्याने डाकू आणि गावाच्या गोष्टींना एक नवं रूप दिलं. आणि मग येतं ‘शोले’चं म्युझिक. आर. डी. बर्मन यांचं संगीत आणि आनंद बक्षी यांचे बोल—‘ये दोस्ती’, ‘होली के दिन’, ‘महबूबा महबूबा’—ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. Sholay प्रत्येक डायलॉग्स वर तर इतके प्रसिद्ध झाले की थिएटरच्या पडद्यावरून थेट ते लोकांच्या जिभेवर आले. ‘शोले’ चा भारतीय सिनेमावर झालेला परिणाम तर प्रचंड होता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सिनेमाने लेखकांना स्टार बनवलं. सलिम-जावेद ही जोडी ‘शोले’ नंतर इतकी फेमस झाली की त्यांचं नाव सिनेमाच्या पोस्टरवर स्टार्सपेक्षा मोठं छापलं जायचं. या सिनेमाने स्क्रिप्ट रायटिंगला एक नवीन दर्जा दिला.
================================
हे देखील वाचा: Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================ं
याआधी लेखकांना फारसं महत्त्व नव्हतं, पण ‘शोले’ ने हे चित्र बदललं. त्याचबरोबर, या सिनेमाने बॉलीवूडमध्ये मल्टी-स्टारर सिनेमांचा ट्रेंड आणला. ‘शोले’ ने बॉलीवूडच्या अॅक्शन जॉनरला नवी दिशा दिली. यानंतर अनेक सिनेमे ‘शोले’ च्या स्टाईलने प्रेरित झाले. डाकू, गाव, बदला, आणि दोस्ती या थीम्सवर अनेक सिनेमे बनले. पण कोणताही सिनेमा ‘शोले’ च्या उंचीला पोहोचू शकला नाही. याचबरोबर गब्बर सिंगच्या पात्राने अमजद खान यांना रातोरात स्टार बनवलं. आज डिजिटल युगात ‘शोले’ ची जादू कायम आहे. बीबीसी इंडियाने 1999 मध्ये ‘शोले’ ला ‘फिल्म ऑफ द मिलेनियम’ म्हणून घोषित केलं, तर ‘शोले’ फक्त एक सिनेमा नाही, तर एक अनुभव आहे. त्याने भारतीय सिनेमाला केवळ मनोरंजनच नाही, तर एक सांस्कृतिक वारसा दिला.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi