‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

जया, रेखा यांच्याआधी ‘या’ मुलीवर होतं Amitabh Bachchan यांचं प्रेम
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या गाजलेल्या जोड्या आणि त्यांच्या अफेरचे किस्से आजही प्रेक्षकांना जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो… बऱ्याच गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा… त्यांच्या रिलेशनचे किस्से आपण ऐकले आहेतच… त्यांची लव्हस्टोरी अपुर्ण राहिली पण जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला ५० वर्ष पुर्ण झाली… मात्र, तुम्हाला माहित आहे का? रेखा आणि जया यांच्याआधी अमिताभ बच्चन यांच्या जीवनात एक मुलगी होती.. कोण होती ती आणि काय होता तो किस्सा जाणून घेऊयात…

बॉलिवूड सेलिब्रिटींचे किस्से लिहिणारे हनीफ झवेरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन यांचा कुणालाही फारसा माहीत नसलेला लव्ह स्टोरीचा खुलासा करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पहिल्या प्रेमाची आणि त्यानंतर झालेल्या ब्रेकअपची कहाणी देखील सांगितली आहे. तर, अमिताभ बच्चन मुंबईत येण्यापूर्वीच त्याच्या आयुष्यात ती तरुणी होती…आणि त्यांच्या पहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटाचं प्रदर्शन होण्यापूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं.
==============
हे देखील वाचा : ‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !
==============
तर, ‘मेरी सहेली’ या युट्यूब चॅनलना दिलेल्या मुलाखतीत बोलताना हनीफ झवेरी म्हणाले की, “माया नावाच्या तरुणीसोबत अमिताभ यांचं सूत जुळलं होतं. त्यावेळी बिग बी कोलकातामध्ये राहायचे आणि तिथे काम करत असताना त्यांना २५०-२०० रुपये प्रति महिना मिळायचे. आणि त्यावेळी माया ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करत होती… अमिताभ बच्चन यांचा तिच्यावर फार जीव होता आणि तीसुद्धा बिग बींच्या आकंठ प्रेमात बुडाली होती…”
हनीफ झवेरी पुढे म्हणाले की, कोलकात्यातील नोकरीनंतर अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले आणि सुरुवातीला जुहू इथल्या एका बंगल्यात ते राहत होते, जो त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्या एका मित्राचा होता. माया अनेकदा तिथे त्यांना भेटायला यायची. त्याच बंगल्यात अमिताभ बच्चन यांच्या आईचा मित्रही राहायचा, त्यामुळे बिग बी यांना माया आणि त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या आईला कळेल, याची भीती वाटायची. म्हणून त्यांनी तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ते त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी‘ वर काम करत होते. त्यावेळी ते मेहमूद यांचा भाऊ अन्वर अलीसोबत काम करत होते आणि त्यांनी त्यांच्या सर्व अडणी अन्वरला सांगितल्या होत्या.. मग काय बिग बी यांना अन्वर जागा मिळवून दिली”.

पुढे हनीफ झवेरी म्हणाले, “बिग बी आणि माया काही काळ एकत्र राहिले असते, तर पुढे कदाचित दोघांचं लग्न झालं असतं, पण त्यावेळी अमिताभ यांची कारकीर्द फार स्थिर नव्हती. त्या काळात अमिताभ फार लाजाळू होते आणि माया खूप हुशार, चुनचुनीत होती. बऱ्याचदा तर बिग बींसोबत कुणी आहे, याचंही भान तिला राहायचं नाही, ती वाट्टेल तसं बिग बींसोबत बोलायची. अन्वर अली आणि अमिताभ यांच्या इतर मित्रांना हे अजिबात आवडायचं नाही”.
================================
हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
=================================
“जेव्हा अमिताभ गोव्यात ‘सात हिंदुस्थानी’ चं शुटिंग करत होते, त्यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांनी मायासोबतचं नातं तोडायला सांगितलं होतं. त्यांना वाटायचं की, माया बच्चन कुटुंबात फिट बसणार नाही शिवाय मायामुळे त्यांच्या अडचणी देखील वाढल्या असत्या. अखेर एक दिवस अमिताभ बच्चन आणि माया यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा ब्रेकअप झालं”, अशी माहिती झवेरी यांनी दिली… दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा हा पहिला चित्रपट १९६९ मध्ये रिलीज करण्यात आला. आणि त्यांनतर काही काळाने १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांनी जया भादुरी यांच्याशी लग्न केलं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi