Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Jolly LLB 3 : दोन जॉली दुप्पट धमाल करणार!
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख असणारा ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे… दोन्ही जॉली प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत… ”जॉली एल.एल.बी’ आणि ‘जॉली एल.एल.बी २’ या दोन्ही भागांमधील दोन्ही जॉली तिसऱ्या भागात एकमेकांसमोर उभे राहून केस लढणार आहेत… आणि यावेळी देखील त्यांच्या केसचा निकाल देणारे न्यायाधीश असणार आहेत अभिनेते सौरभ शुक्ला… नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे…( bollywood news)

‘जॉली एलएलबी ३”च्या टीझरमध्ये सुरुवातीला दिल्लीतील जिल्हा सत्र न्यायालय दिसतं. यामध्ये आधी मेरठमधील जॉली म्हणजेच अर्शद वारसीची एन्ट्री होते. अर्शद आणि न्यायाधीश यांच्यात सुरुवातीला संवाद सुरु असतो.. न्यायाधीश जॉलीला विचारतात की तुमचा राग आता शांत झालाय का? यावर, अर्शद वरवर प्रेमाने सांगतो पण अशातच तो इतरांशी मारामारी करताना दिसतो. त्यानंतर दुसरा जॉली म्हणजे कानपूरच्या जॉलीची एन्ट्री होते. अक्षय कुमार त्याच्या खास अंदाजात कोर्टात येतो. तो कोर्टात पाऊल ठेवताच न्यायाधीश त्रिपाठींच्या पाया पडायला जातो. पण न्यायाधीश त्रिपाठी त्याला दूर राहायला सांगतात.
================================
हे देखील वाचा : Jolly LLB 3 : अर्शद-अक्षयचा कोर्ट ड्रामा, जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहिर
=================================
या चित्रपटाच्या टीझरशेवटी दिसतं की दोन्ही जॉलीमध्ये हाणामारी होते. दोघांच्या कारस्थानांना न्यायाधीश त्रिपाठी कंटाळतात. हे देवा, एक जॉली सांभाळू शकत नाही इथे दोन जॉली आले आहेत, असं ते म्हणतात. त्यामुळे आता दोन्ही जॉली काय धमाल उडवून देतात हे पाहण्याची लोकांची उत्सुकता अधिक वाढली आहे… सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला यांच्या धमाल अभिनयाची जुगलबंदी पाहता येणार आहे… हा चित्रपट देशभरात १९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.(Jolly LLB 3 cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi