“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar चा सरकारला सवाल…
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आपल्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रियतेसाठी देखील ओळखला जातो. तो फक्त सिनेमे किंवा मालिकांमधील अपडेट्सच शेअर करत नाही, तर अनेकदा समाजातील घडामोडींवरही आपले मत निडरपणे व्यक्त करतो. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून नेहमीच सामाजिक भान दिसून येतं. त्यामुळे त्याचे चाहते आणि इतर सिनेप्रेमी त्याच्या मतांकडे गांभीर्याने लक्ष देतात. अलिकडेच भारतात जगप्रसिद्ध कंपनी Tesla चं स्वागत करण्यात आलं. मुंबईच्या BKC मध्ये Tesla Motors ने आपली पहिली शाखा सुरू केली आणि त्यानंतर देशभरातून Tesla कारसाठी जबरदस्त मागणी येऊ लागली. पण या चमचमत्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर शशांक केतकरने सरकारला एक थेट प्रश्न विचारला आहे, जो लाखो भारतीयांच्या मनात घोळतोय.(Actor Shashank Ketkar)

शशांकने आपल्या Instagram Story वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने प्रथम Tesla चे भारतात स्वागत करत लिहिले आहे की, “भारतात असताना भारतीयांसारखं कार्य करा. @teslamotors, तुमचे भारतात स्वागत आहे.” परंतु लगेचच त्याने सरकारला टोमणा मारत गंभीर सवाल केला आहे, “गंमत याची वाटते Tesla आणलीत! आता चांगले रस्ते? शिस्त? ते केव्हा आणाल?” शशांकच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “Tesla सारख्या सुपरकार भारतात आली, पण त्या कारसाठी योग्य रस्ते तरी आहेत का?” असा प्रश्न जनतेतून मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे.

शशांकची ही चिंता खरी मानली तर भारतातील अनेक नॅशनल हायवे आजही दुर्दशेत आहेत. पावसाळा आला की रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते. अपघात, ट्राफिक जाम, अधुरी कामे, तुटलेले रस्ते ही सगळी चित्रं रोजच नागरिकांच्या डोळ्यांसमोर उभी राहतात. शशांकने आपल्या पोस्टमधून सरकारकडे साधा पण महत्वाचा प्रश्न केला आहे. “Tesla आणणं सोपं आहे, पण नागरिकांना सुरक्षित रस्ते देणं अवघड का?” यावरून सामान्य जनतेनेही पुन्हा एकदा शासनाने रस्त्यांच्या दर्जाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.(Actor Shashank Ketkar)
==============================
हे देखील वाचा: ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर; ‘सयाजी शिंदे’ साकारणार विजय तेंडुलकरांची गाजलेली भूमिका!
==============================
या पोस्टनंतर शशांकचे चाहते त्याला “जनतेचा खरा आवाज” असं म्हणत कौतुक करत आहेत. Tesla सारख्या कार भारतात आली हे जरी आनंदाचं असलं, तरी त्या कारसाठी योग्य रस्ते असणं हे तितकंच महत्वाचं असल्याचा मुद्दा शशांकने मांडला आहे. त्यामुळे आता सरकार या प्रश्नाकडे लक्ष देतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.