
Achyut Potdar : “अरे कहना क्या चाहते हो..”; ३ इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन
मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांचं १८ ऑगस्ट २०२५ रोजी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झालं… त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर सोककळा पसरली आहे… अच्युत यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवलीच; सोबतच आपल्या साधी राहणीमानामुळे लोकांना ते फार आपले वाटत होते… लोकांचं मनोरंजन करणाऱ्या अच्युत यांनी एकेकाळी चक्क देशसेवा देखील केली आहे… जाणून घेऊयात या बहुआयामी कलाकाराचा प्रवास…(Entertainment News)

अच्युत पोतदार यांचा जन्म २२ ऑगस्ट १९३४ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं संपूर्ण बालपण इंदूरमध्ये गेलं… १९६१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे प्राध्यापक म्हणून नोकरी देखील केली… तसेच, लग्न झाल्यानंतर अच्युत यांनी भारतीय आर्मीत प्रवेश घेत १९६२ ते १९६७ या काळात भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून सेवा देखील बजावली होती… इतकंच नाही तर त्यांनी इंडियन ऑइलमध्ये २५ वर्षे कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आणि १९९२ मध्ये वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त झाले. (Bollywood)

अच्युत यांच्याबद्दल एक विशेष बाब म्हणजे त्यांनी अभिनयात कुठंलही शिक्षण घेतलं नव्हतं.. वयाचू चाळीशी ओलांडल्यानंतर ८०च्या दशकात त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली…. छंद म्हणून सुरु झालेला त्यांचा हा अभिनयाचा प्रवास ४० वर्षांपेक्षा जास्त अविरतपणे सुरु होता… अच्युत यांनी १२५ हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये आणि मराठी चित्रपट व नाटकांमध्येही कामं केली आहेत… त्यांनी ९५ टेलिव्हिजन मालिका, २६ नाटके आणि ४५ जाहिरातींमध्ये कामं केली आहेत….
================================
=================================
अच्युत यांनी ‘अर्ध सत्य’, ‘परिंदा’, ‘रंगीला’, ‘दामिनी’, ‘३ इडियट्स’, ‘फरारी की सवारी’, ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘तेजाब’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘हम साथ साथ है’, भाई’, ‘दबंग 2’ आणि ‘व्हेंटिलेटर’, ‘वास्तव’, ‘नवरी मिळे नवर्याला’, ‘ये रे ये रे पैसा’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत… वडील, प्राध्यापक, किंवा गंभीर व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली. तसेच, मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘अप्पा’ ही भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली होती… आपल्या कामाप्रती ते इतके एकनिष्ठ होते की तब्येतीमुळे त्यांना मालिकेच्या सेटवर शुटींगसाठी जाता येत नव्हते तर ते घरातूनच शुट करत होते… त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक कसलेला अभिनेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi