
Janhvi Kapoor : अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि ‘दिल से’ महाराष्ट्रीयन”; जान्हवीची पोस्ट चर्चेत!
९०चं दशक आपलं अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी… अर्थात श्रीदेवीपेक्षा त्यांच्या मुली कमी टॅलेंन्टेड जरी असल्या तरी आपल्या आईची अभिनयाची Legeacy पुढे नेत आहेत… सध्या श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या आगामी परमसुंदरी चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे… साऊथ आणि नॉर्थचं परफेक्ट कॉमेबिनेशन ‘चेन्नई एक्सप्रेस’नंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या परमसुंदरी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे… दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात जान्हवीने मराठीत बोलून लोकांचं मन जिंकलं होतं.. अशातचं जान्हवीची एक पोस्ट विशेष चर्चेत आहे…(Janhvi Kapoor News)

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने राम कदम यांच्या दहिहंडी उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती… या कार्यक्रमात जान्हवीने मराठीत संवाद साधला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या मराठी बोलण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या कार्यक्रमानंतर जान्हवीनं इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत महाराष्ट्रावरील प्रेम व्यक्त केलं… जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि दिल से महाराष्ट्रीयन”. तिच्या या कॅप्शननं मराठी चाहत्यांचं मन जिंकलं आहे…
================================
=================================
दरम्यान, जान्हवीची आई अर्थात श्रीदेवी या दाक्षिणात्य, तर वडील बोनी कपूर पंजाबी.. आता असा प्रश्न पडतो की दिल से महाराष्ट्रीयन याचा अर्थ काय? तर, मुंबईत लहानाची मोठी झाल्याने जान्हवीचं मराठी संस्कृतीशीही घट्ट नातं आहे. म्हणूनच तिनं स्वतःला ‘दिल से महाराष्ट्रीयन’ असं म्हटलं. याशिवाय, जान्हवी लवकरच महाराष्ट्राची सून होणार असं म्हटलं जात आहे… त्याचं कारण असं की, जान्हवी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पाहारिया याला डेट करतेय. अजून त्यांच्या नात्याबद्दल दोघांनी ऑफिशिअल जाहिर केलं नसलं तरी सगळीकडेच दोघं एकत्र दिस असल्यामुळे लोकांनी तरी दोघांना कपल म्हणून जाहिर केलं आहे.. जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असणारा ‘परमसुंदरी’ चित्रपट येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात रिलीज होणार आहे…(Bollywood News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi