Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!

Jolly LLB 3 : अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो!
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे… नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून हा सीक्वेल प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे… संपूर्ण चित्रपटाची कथा कॉमेडी कोर्टरुम ड्रामा असून तिसऱ्या भागात न्यायाधीश आणि वकील यांच्यातील संभाषणात वकीलांनी न्यायाधीशांचा अपमान केल्याचा आरोप पुण्याच्या काही वकीलांनी केला असून अक्षय, अर्शद आणि चित्रपटाची इतर टीम यांना समन्स बजावण्यात आले आहेत..(Entertainment News)

‘जॉली एलएलबी’ चित्रपटाचा पहिला भाग हा २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१७ मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग ‘जॉली एल.एल.बी २’ रिलीज झाला होता.. आणि आत तब्बल ८ वर्षांनी तिसरा भाग येणार असून रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. पुण्यातील वकील अॅड. वाजेद खान (बिडकर) आणि अॅड. गणेश म्हस्के यांनी या चित्रपटातील काही प्रसंग वकील आणि न्यायाधीशांचा अवमान करतात, असा आरोप करत दिवाणी न्यायालयात दाद मागितली आहे.

दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या मते, ‘जॉली एल.एल.बी ३’ च्या टीझरमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांनी वकीलांच्या पोशाखात विनोद करत प्रमोशन केले आहे. यामुळे वकिली व्यवसायाची प्रतिमा मलिन झाली असून समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा दावा केला गेला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना १२ वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी चित्रपटातील कलाकार व निर्मात्यांना समन्स बजावले असून अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना २८ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(Jolly LLB 3 movie)
================================
हे देखील वाचा : Jolly LLB 3 : दोन जॉली दुप्पट धमाल करणार!
=================================
खरं तर बॉलिवूडचा चित्रपट कोर्ट कचेरीत अडकण्याची ही पहिली वेळ नाही… यापूर्वी देखील बऱ्याच चित्रपटांना अशा वादांचा सामना करावा लागला होता.. मात्र, सिनेमा लिबर्टीच्या नावाखाली जर का एखाद्या पेशाचा अवमान केला जात असेल तर नक्कीच तो सहन केला जाणार नाही… त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल नेमका काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… ‘जॉली एल.एल.बी ३’ चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज होणार असून यात अर्शद वारसी, अक्षय कुमार आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत…(Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi