
Sunny Deol : “अनेकांना वाटलं ‘गदर’ चालणार नाही, पण…”; स्वत:च्या हिट चित्रपटाबद्दल काय म्हणाला सनी?
“ये ढाई किलो का हाथ है…” खरंच डायलॉगप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता सनी देओल (Sunny Deol)… आपल्या सिनेकारकिर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले.. त्यातील बेस्ट चित्रपट म्हणदे ‘गदर’ (Gadar : Ek Premkatha)… या चित्रपटाने खरं बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे… २००१ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडं कलेक्शन करत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं… पण तुम्हाला माहित आहे का? जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा तो इतका हिट होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं.. यावर आता पहिल्यांदाच सनी देओल याने आपली प्रतिक्रिया दिली आहे… नेमकं तो काय म्हणाला आहे जाणून घेऊयात…

नुकत्याच दिलेल्या झुमला दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘गदर-एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. त्याविषयी बोलताना सनी म्हणाला की, “जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा मी ऊटीमध्ये दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यादरम्यान, अनिल शर्मा तिथे आले आणि त्यांनी मला स्क्रिप्ट ऐकवली. त्यावेळी हा प्रोजेक्ट करावा, अशी काही माझी इच्छा नव्हती, कारण मी अनिल शर्मांचे चित्रपट कधीच पाहिले नव्हते. मी फक्त त्यांचे अॅक्शन सीन्स पाहिले होते.”(Bollywood News)
पुढे सनी देओल म्हणाला की, “जेव्हा मी चित्रपटाची संपू्र्ण स्क्रिप्ट ऐकली तेव्हा ती मला खूपच आवडली. त्यानंतर रात्रभर आम्ही पुन्हा-पुन्हा स्क्रिप्ट ऐकली आणि त्यावर चर्चा करत बसलो होतो. परंतु, हा एक परियड ड्रामा असावा असं माझं मत होतं, त्याच्याशिवाय कथानक इंटरेस्टिंग झालं नसतं. प्रत्येक सिनेमा मी आवडीने करतो कारण त्यासोबत बऱ्याच आठवणी जोडलेल्या असतात. “

या मुलाखतीत ‘गदर-एक प्रेम कथा’वर शंका घेणाऱ्यांबद्दल बोलताना सनी देओल म्हणाला की, “इंडस्ट्रीतील काही लोकांना असं वाटत होतं की, यात काही तालमेळ नसल्याने फारसं काही यश मिळणार नाही. मात्र, या चित्रपटाचं यश सर्वांनी पाहिलं आणि त्या गोष्टी कोणीही रोखू शकत नाही.”अशा भावना अभिनेत्याने मुलाखतीत व्यक्त केल्या.
================================
हे देखील वाचा : “Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत
=================================
सनी देओल याच्या गदर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर २’ (Gadar 2) थिएटरमध्ये २०२३ मध्ये रिलीज झाला होता.. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता… आता लवकरच सनी देओल नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटान हनुमानाची भूमिका साकारणार आहे… या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता माता आणि यश रावणाची भूमिका साकारणार आहेत… याव्यतिरिक्त सनी देओल ‘बॉर्डर २’ (Border 2) मध्ये देखील दिसणार असून यात वरुण धवन असणार आहे…(Sunny Deol Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi