
Kaun Banega Crorepati मध्ये १ कोटी जिंकले तरी खात्यात जमा होते केवळ ‘एवढीच’ रक्कम !
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरतो. ज्ञान, हुशारी आणि संयमाच्या जोरावर स्पर्धक करोडपती बनतात आणि त्यांच्या यशाची गोष्ट संपूर्ण देशभर चर्चिली जाते. या सीझनमध्येही तसंच घडलं आहे. 11 ऑगस्टपासून सुरू झालेल्या KBC च्या 17 व्या सीझनला अखेर त्याचा पहिला करोडपती मिळाला आहे. उत्तराखंडचे रहिवासी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) कमांडंट पदावर कार्यरत असलेले आदित्य कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे.(Kaun Banega Crorepati)

आदित्य कुमार यांच्या या कामगिरीनंतर त्यांच्या कुटुंबात आणि संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा आत्मविश्वास, धाडस आणि प्रचंड ज्ञान यामुळे ते करोडपती बनले, पण या आनंदासोबत एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी सगळ्यांनाच पडतो तो असा की, विजेत्याला खरंच पूर्ण 1 कोटी मिळतात का?तर याचं उत्तर आहे ‘नाही’. कारण, भारतातील प्राप्तिकर नियमांनुसार (Income Tax Rules), केबीसी सारख्या स्पर्धांमधून मिळालेल्या रकमेवर थेट कर लागू होतो. 1 कोटी रुपयांच्या जिंकलेल्या बक्षीस रकमेवर 30% फ्लॅट इनकम टॅक्स, त्यावर अधिभार आणि सेस धरला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष विजेत्याच्या खात्यात जमा होणारी रक्कम कमी होते. गणित मांडल्यास, आदित्य कुमार यांच्या खात्यात करकपातीनंतर जवळपास १ कोटींमधले फक्त 65.68 लाख रुपये जमा होतील.

हे उत्पन्न आयकर विभागाकडे दाखवणे ही बंधनकारक असते. म्हणजेच, विजेत्याने आपला Income Tax Return (ITR) दाखल करताना ही रक्कम “Income from Other Sources” या विभागाखाली दाखवावी लागते. यामुळे अनेकदा प्रेक्षकांना आश्चर्य वाटते की मोठ्या रकमेतील जवळपास अर्धा भाग करामध्ये जातो.(Kaun Banega Crorepati)
==================================
हे देखील वाचा: Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!
==================================
तरीदेखील, KBC सारख्या मंचावर बसून 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठणे हीच एक मोठी गोष्ट आहे. आदित्य कुमार यांनी फक्त पैशाचा नव्हे तर सन्मानाचा मुकुट जिंकला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल की, सातत्याने अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वप्नं खरी होऊ शकतात.