जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…
‘सैराट’ हा मराठीतील पहिला १०० कोटींचा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज वाढदिवस… मंजुळे यांनी हालाखीच्या परिस्थितीतून स्वत:ला उभं करत सिद्ध केलं. बऱ्याचा अपयश येऊनही यशाची वाट काही त्यांनी सोडली नाही… एका मुलाखतीवेळी नागराज मंजुळेंनी त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेल्याचा एक किस्सा सांगितला होता… नागराज मंजुळे यांनी ‘पिस्तुल्या’ चित्रपट केला होता आणि याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता… तोच पुरस्कार चोरीला गेल्यावर काय झालं होतं याचा किस्सा स्वत: मंजुळेंनी सांगितला होता…

नागराज मंजुळे म्हणाले होते की, “ ‘फॅन्ड्री’ चं शुटिंग होतं. शुटिंगचा शेवटचा दिवस होता. म्हणून मी आईला शुटिंगला बोलावलं होतं. पण त्याच दिवशी आमच्या घरात चोरी झाली. तेव्हा ‘पिस्तुल्या’ सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला. माझ्या भावाने मला या चोरीबद्दल सांगितलं. ही चोरी झाली तेव्हा माझी आई घरी होती. म्हणून मग मी आधी विचारलं ती कशी आहे. तिला काही झालं तर नाही ना… याची मी आधी चौकशी केली”…
पुढे मंजुळे म्हणाले की, “मग मी विचार केला की चोराला कधी नॅशनल अवॉर्ड मिळणार? म्हणून मग म्हटलं झालं ते झालं… चोरांना कदाचित माहितही नसेन की तो नॅशनल अवॉर्ड आहे म्हणून… त्यांना वाटलं असेल की काही तरी चांदीचं आहे. म्हणून त्यांनी ते नेलं असेल… पण त्याचं पुढे काय झालं असेल ते त्यांनाच माहिती… ते कुणाला विकलं असेल की ते कुठे पडून असेन माहिती नाही”…
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
=================================
“अनेकांना वाटलं की मला याचं वाईट वाटलं असेल”. कवी किशोर कदम मला म्हणाले की, “तुला वाईट वाटलं असेल. पण पुढच्या फॅन्ड्री सिनेमाला तुला अवॉर्ड मिळेल. पण मला हे अवॉर्ड मिळावं म्हणून मी काम नाही करत. पण पिस्तुल्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी विसरून गेलो होतो. तेव्हा तो नॅशनल अवॉर्ड मिळाला. माझ्या भावाला पण खूप वाईट वाटलं. पण मी त्यालाही म्हटलं की, चोराला कुठं नॅशनल अवॉर्ड मिळतं? जाऊ दे तू कशाला टेन्शन घेतो. असं मी माझ्या भावाला समजावलं”, असं नागराज मंजुळे म्हणाले.

दरम्यान, नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी २०१० मध्ये दिग्दर्शकीय प्रवास सुरु केला होता… १५ वर्षांच्या या कारकिर्दित त्यांनी ‘बाजी’, ‘हायवे’, ‘झुंड’, ‘नाळ’, ‘तार’, ‘घर, बंदुक बिर्याणी’ असे बरेच चित्रपट केले… दिग्दर्शनासोबत बऱ्याच चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi