Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला दमदार आवाज
मराठी कलाकार अभिनय, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत… इतकंच नाही तर डबिंग क्षेत्रात बऱ्याच मराठी कलाकारांनी एकाहून एक दर्जेदार पात्रांना आपला आवाज दिला आहे… आपल्याकडे बहुतांशी तमिळ, तेलुगू, कन्नडा चित्रपट हिंदी भाषेत डब केले जातात… अभिमानाची बाब म्हणजे ‘पुष्पा’ (Pushpa Movie) असो किंवा ‘बाहुबली’ (Bahubali Movie) साऊथच्या या सुपरहिट पात्रांना हिंदी वर्जन्समध्ये मराठी कलाकारांनी आवाज दिला आहे… चला तर मग जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल…

‘बाहुबली’ या चित्रपटाने देशातच नाही तर जगभरात इतिहास रचला आहे… हजारो कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या या चित्रपटातील प्रमुख पात्र म्हणजे बाहुबली… चित्रपटात ही भूमिका प्रभासने (Prabhas)साकारली आहे; आणि या चित्रपटाच्या हिंदी वर्जनसाठी अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) याने त्याला आवाज दिला आहे… शरदच्या भारदस्त आवाजामुळे बाहुबली हे पात्र अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले यात शंकाच नाही…(south dubbed hindi movies) या नंतरचा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)… अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील दोन्ही हिंदी वर्जन्सला श्रेयसने आवाज दिला आहे..

पुढचा डबिंग आर्टिस्ट आहे संकेत म्हात्रे (Sanket Mhatre), ज्याने सुर्या, अल्लू अर्जून (Allu Arjun), महेश बाबू, विजय या साऊथ सुरस्टार्सना त्यांच्या हिंदी चित्रपटांच्या वर्जन्सना आवाज दिला आहे… तर, ‘केजीएफ’ (KGF Movie) या चित्रपटातील रॉकी ही भूमिका साकारणाऱ्या यश या पात्राला सचिन गोळे (Sachin Gole) यांनी आवाज दिला होता… त्यांनी यश सोबतच धनुष, अल्लू अर्जून यांनाही आवाज दिला आहे… या पुढील डबिंग आर्टिस्टचं नाव आहे विनोद कुलकर्णी (Vinod Kulkarni)… विनोद यांनी ब्रह्मनंदम यांना रिबेल कंदिरिगा, दोसुकेल्था, आर्य 2 आणि पॉवर या सारख्या चित्रपटांसांठी आवाज दिला आहे.
================================
हे देखील वाचा : Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….
=================================
अभिमानाची बाब म्हणजे या सर्व पुरुष अभिनेते-डबिंग आर्टिस्ट यांच्यामध्ये एक स्त्री डबिंग आर्टिस्ट असून गेले अनेक वर्ष ती कार्टून्सपासून बऱ्याच चित्रपटात कलाकारांना आणि त्यांच्या विविध पात्रांना आवाज देत आहे… ती डबिंग आर्टिस्ट म्हणजे मेघना एरंडे (Meghana Erande).. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या हिंदी वर्जनसाठी मेघनाने शिवगामी या पात्राला आवाज दिला आहे… त्यामुळे चित्रपटसृष्टी किंवा मनोरंजनातीव असं एकही क्षेत्र नसेल जिथे मराठी कलाकारांनी आपली छाप उमटवली नसेल…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi