
Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं तरी किती?
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘परम-सुंदरी’ (Param Sundari) चित्रपट २९ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला… नॉर्थ आणि साऊथची आगळीवेळी लव्हस्टोरी मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना काही अंशी चेन्नई एक्सप्रेसची आठवण करुन देणारा आहे… एकीकडे सैयारा आणि महावतार नरसिम्हा चित्रपटाची क्रेझ कमी झाली नसली तरी परम-सुंदरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर स्वत:च अस्तित्व सिद्ध केलं आहे… चला तर जाणून घेऊयात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं आहे…(Bollywood News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘परम सुंदरी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटी आणि चौथ्या दिवशी अजूनतरी ०.१७ कोटी कमवत चार दिवसात चित्रपटाने २६.९२ कोटी कमावले आहेत… तसं पाहायला गेलं तर चित्रपटाने फार कमाई केली नसल्यामुळे येत्या काळात १०० कोटींचा टप्पा चित्रपट गाठू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे… दरम्यान, तुषार जलोटा दिग्दर्शित ‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात नॉर्थचा मुलगा परम आणि दाक्षिणात्य मुलगी सुंदरीची गोंडस प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. परम त्याच्या सोलमेटला भेटण्यासाठी केरळला पोहोचतो आणि तिथे तो सुंदरीच्या प्रेमात पडतो. (Param Sundari box office collection)
============================
============================
आता येत्या काळात बरेच बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत… ४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘बागी ४’ (Baaghi 4) रिलीज होणार असल्यामुळे परम सुंदरीच्या कमाईवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही… तसेच, सिद्धार्थ आणि जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, VVan-Force of the Forrest या चित्रपटटात झळकणार आहे… तर, जान्हवी कपूर ‘सन्नी संस्कारी की तुलसी कुमारी’, ‘Peddi’ आणि ‘विश्माम्बरा’ या चित्रपटात दिसणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi