‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी टेलिकास्ट होणार ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा शेवटचा एपिसोड !
मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांसाठी सतत नवनव्या मालिका येत असतात. प्रत्येक नव्या मालिकेची सुरुवात म्हणजे जुन्या मालिकांना निरोप देण्याची वेळ. अशाच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहवरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच संपणार आहेत. अभिनेत्री शिवानी सुर्वे हिची ‘थोडं तुझं थोडं माझं’ आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या दोन मालिकांचा प्रवास आता शेवटाकडे पोहोचला आहे.(Aai Baba Retire Hot Aahet Last Episode)

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या च्या जागी सुरू करण्यात आली होती. डिसेंबर 2024 मध्ये मालिकेची सुरुवात झाली आणि दहा महिन्यांच्या कालावधीत तिने प्रेक्षकांची मने जिंकली. निवृत्तीनंतरच्या आई-बाबांच्या भावनिक संघर्षांपासून ते कौटुंबिक नातेसंबंधांमधील सूक्ष्म पैलू दाखवणारी ही कथा अनेकांना आपलीशी वाटली. पण आता 13 सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट होणार आहे. तिच्या जागी अभिनेत्री रुपाली भोसलेची ‘लपंडाव’ ही नवी मालिका 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दुसरीकडे, प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही मालिका देखील आता संपणार आहे. शिवानी सुर्वेच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका चर्चेत राहिली होती. पण 12 सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवला जाणार आहे. तिच्या जागी ‘नशीबवान’ ही अगदी नवी मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सुरू होणार आहे.(Aai Baba Retire Hot Aahet Last Episode)
=============================
हे देखील वाचा: Jui Gadkari ने केली नव्या गोष्टीची सुरुवात; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली बातमी !
=============================
एकीकडे प्रेक्षक आवडत्या पात्रांचा निरोप घेणार असले तरी, दुसरीकडे नवीन कथानक आणि नवे चेहरे पाहण्यासाठी उत्सुकही आहेत. प्रत्येक वेळी नव्या मालिकेसोबत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावतात. त्यामुळे ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.स्टार प्रवाहवरील या बदलांमुळे छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा ताजा रंगतदार अध्याय सुरू होणार आहे.