MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Rekha आणि इमरान खान यांचं लग्न होणार होतं?; ४० वर्षांपूर्वीचा तो रिपोर्ट व्हायरल…
हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदरी म्हणजे रेखा… सौंदर्य, अभिनय यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या रेखा यांचं वैयक्तिक जीवनही तितचंट चर्चेत होतं… आजही रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगतेच… ८०-९०चं दशक गाजवणाऱ्या रेखा याचं नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं… अशातच सध्या सोशल मिडियावर चक्क रेखा आणि पाकिस्तानी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अफेरबद्दल चर्चा रंगल्या आहेत.. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…(Rekha Affair with Imran Khan)

तर, सोशल मीडियावर ४० वर्षांपूर्वीची एक बातमी व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेखा आणि इमरान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं म्हटलं जात आहे..१९८५चा हा स्टार रिपोर्ट आता व्हायरल झाला असून त्यानुसार, रेखा आणि इमरान खान अनेकदा एकत्र दिसल्याचंही सांगण्यात आलंय…

रेखा आणि इमरान खान यांच्यात ८०च्या दशकात प्रेमसंबंध फुलले होते असं म्हटलं गेलं आहे..इतकंच नाही तर, त्या दोघांनीही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. काही मीडिया रिपोर्टनुसार, ते दोघे लग्न देखील करणार होते. रेखाच्या आईने या जोडीला पसंती दिली होती… आणि रेखा यांच्या आईने चक्क ज्योतिषाला दोघांच्या पत्रिकाही दाखवल्या होत्या. ते दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच असल्याचं ज्योतिषाने सांगितलं होतं.(Bollywood affairs news)
====================================
हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!
====================================
रेखा आणि इमरान खान यांच्या अफेअरच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या.. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रेखा यांच्या आईला असं वाटत होतं की, इम्रान खान त्यांच्या मुलीसाठी चांगला जोडीदार आहे. म्हणून त्या दिल्लीतील एका नजुमी (ज्योतिषी) कडे गेल्या. त्यावेळी नजुमींनी काय सांगितलं, हे कुणालाच माहीत नाही. पण रेखाची आई इमरान यांना तिच्या कुटुंबात आणण्यास तयार होती. परंतु, रेखाकिंवा इमरान यांपैरी कुणीच या बातमीचा दुजोरा दिला नसल्यामुळे नेमकं त्या रिपोर्टमध्ये असं का लिहिलं गेलं असा प्रशन नेटकरी उपस्थित करत आहेत…(Entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi