Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला भूरळ!
सोशल मिडिया उघडलं की एखादं हिंदी चित्रपटातलं गाणं समोर येतं जे फारशी, इंग्रजी किंवा जगातल्या अन्य कुठल्याही भाषेतील गाण्याचं रिमेक वर्जन आहे हे सिद्ध करतं… इतकंच नाही तर हिंदी चित्रपट असे देखील आहेत ज्यांचे प्रत्येक Scences कॉपी केलेले आहेत… बऱ्याचदा असं होतं की मराठी चित्रपटांची तुलना हिंदीसोबत केली जाते… पण तुम्हाला माहित हे का मराठीतले असे बरेचसे चित्रपट आहेत ज्यांचे रिमेक्स हिंदी आणि साऊथमध्ये झाले आहेत… चला तर मग जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल… (Marathi remakes in south and bollywood)

आत्तापर्यंत आपल्याला माहित आहे की ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ आहे, ‘लपाछपी’चा ‘छोरी’ आहे, ‘मुळशी पॅटर्न’चा ‘अंतिम – द फायनल ट्रुथ’ आहे… तर असे इतर कोणते चित्रपट आहेत ज्याचा रिमेक हिंदी आणि साऊथमध्ये झाला आहे…? पहिला चित्रपट आहे ‘डोंबिवली फास्ट’… २००५ मध्ये निशिकांत कामत दिग्दर्शित या चित्रपटात एका सामान्य माणसाचं जीवन दाखवलं गेलं होतं… संदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर, संजय जाधव मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा तामिळ रिमेक स्वतः निशिकांत कामत यांनीच बनवला होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवलं होतं… या तामिळ चित्रपटाचं नाव होतं ‘इव्हानो ओरुवन‘ (Evano Oruvan). यामध्ये आर माधवन याने प्रमुख भूमिका साकारली होती.

पुढचा चित्रपट आहे आफल्या सगळ्यांचा फेव्हरेट ‘मुंबई-पुणे-मुंबई’… सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपचात मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या… २०१० मध्ये आलेल्या या मराठी चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला होता ज्याचं नाव होतं ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ आणि याचं दिग्दर्शन हिंदीतही सतीश यांनीच केलं होतं… या नंतर चित्रपटाचा कन्नड रिमेक ‘प्यारगे आगबित्तेत‘ (Pyarge Aagbittaite) या नावाने, तर तेलगू रिमेक ‘मेड इन विझाग (Made in Vizag)’ या नावाने प्रदर्शित झाला होता… पुढचा चित्रपट आहे ‘टाईमपास’… रवी जाधव दिग्दर्शित आणि केतकी माटेगांवकर व प्रथमेश परब अभिनित हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता…या चित्रपटाचा तेलगू रिमेक ‘आंध्रा पोरी (Andhra Pori) या नावाने करण्यात आला होता.

यानंतरचा चित्रपट हे तो म्हणजे रितेश देशमुखचा ‘लय भारी’… निशिकांत कामत दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ मध्ये रिलीज झाला होता… मराठी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या चित्रपटाचा ओडिसा भाषेत रिमेक करण्यात आला होता. ज्याचं नाव होतं ‘जगा हातरे पाघा’ (Jaga Hatare Pagha)… आणि पुढचा चित्रपट आहे ‘नटसम्राट’… रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या चित्रपटाचा गुजराती भाषेत ‘नटसम्राट’ याच नावाने तर, तेलगू मध्ये ‘रंगमार्थंड’ या नावाने रिमेक करण्यात आला होता.

आता वळूयात मराठीचे असे चित्रपट ज्यांचे रिमेक बॉलिवूडने केले आहेत… ‘पोस्टर बॉईज’ हा २०१७ मध्ये आलेला चित्रपट श्रेयस तळपदे याचा बॉलिवूडमधील दिग्दर्शकीय पदार्पणातील पहिला चित्रपट होता… मराठीतील ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे हे प्रमुख कलाकार होते… पुढचा चित्रपट आहे ‘दम लगा के हैशा’. २०१५ मध्ये आलेल्या या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराना यांच्या प्रमुख भूमिका होत्या.. हा चित्रपट २०१० मध्ये आलेल्या ‘अगडबम’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता…

पुढचा चित्रपट आहे ‘गोलमाल रिटर्न्स’… २००८ मध्ये आलेला हा चित्रपट १९८९ मध्ये आलेल्या ‘फेका फेकी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असून मराठी चित्रपटात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुख्य भूमिका होत्या… यानंतरचा चित्रपट आहे ‘हे बेबी’… २००७ ला रिलीज झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान आणि विद्या बालन प्रमुख कलाकार होते… हा चित्रपट १९८७ मध्ये आलेल्या ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ चित्रपटाचा रिमेक होता…
यानंतर ज्या चित्रपटाचा या यादीत समावेश होतो तो म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’.. १९८८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचा रिमेक हिंदी ‘पेईंग गेस्ट’ या नावाने २००९ मध्ये केला गेला होता… ज्यात श्रेयस तळपदे, जावेद जाफ्री, आशिष चौधरी आणि वत्सल शेठ यांच्या प्रमुख भूमिका होत्या…खरं तर लिस्ट बहोत लंबी है.. पण जाता जाता आणखी एक शेवटचा चित्रपट तो म्हणजे हलचल…करिना कपूर आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असणारा ‘हलचल’ चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता… जो १९९३ मध्ये आलेल्या ‘घायाळ’ चित्रपटाचा रिमेक होता… या चित्रपटात पद्मा चव्हाण, मधुकर तोरडमल, अशोक सराफ, नीना कुलकर्णी, शिवाजी साटम, अजिंक्य देव असे दिग्गज कलाकार होते…
================================
हे देखील वाचा : Radhika Apte : ‘OTT’ची खरी क्वीन!
=================================
भविष्यात मराठीचे हिंदीत, हिंदीचे साऊथ भाषेत किंवा इतर कुठल्याही भाषेतील चित्रपट आपल्या मातृभाषेत तयार करुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक मेकर्स करत राहिल… आपण प्रेक्षकांनी मात्र उत्स्फुर्तपणे चित्रपट पाहिले पाहिजेत आणि मनोरंजनाचा सपाटा सुरुच ठेवला पाहिजे….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi