Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न

Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न घेता केले अॅक्शन सीन
सर्वत्र सध्या एकाच मराठी चित्रपटाचा बोलबाला सुरु आहे; तो चित्रपट म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार’ (Dashavatar Movie)… कोकणातील दशावतार हा लोकनृत्य प्रकार आणि त्याला जोडून एक रहस्यमय कथानक या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे… या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा प्रेक्षकांना अचंबित करणार असून यात विविध पात्र साकारताना दिसत आहेत.. दशावतार या चित्रपटात प्रभावळकरांचा हटके लूक तर आहेच पण वयाच्या ८१व्या वर्षी कुठल्याही बॉडी डबलचा वापर न करता त्यांनी चित्रपटातील स्टंट केला आहे…

आजकाल तर हिंदी असो किंवा मराठी तरुण कलाकार देखील स्टंट करताना बॉडी डबलचा वापर करतात… दशावतार चित्रपटाच्या बाबतीतही दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी प्रभावळकरांच्या वयाचा विचार करून बॉडी डबल ठेवण्याची तयारी केली होती. सेटवर बॉडी डबल सदैव उपस्थितही होते. मात्र दिलीप प्रभावळकरांनी (Dilip Prabhavalkar) ‘ॲक्शन सीन्स नैसर्गिक वाटावेत’ म्हणून ते मीच करणार’, असं ठामपणे सांगितलं आणि ते प्रत्यक्षात त्यांनी करूनही दाखवलं.

जंगलातील धावपळीचे प्रसंग, नदीतील पोहण्याचे प्रसंग, अंडरवॉटर शूटींग असं सारं काही दिलीप प्रभावळकर यांनी स्वत: चित्रपटात केलं आहे… दशावतार चित्रपटाची कथाच मुळात कोकमातील असल्यामुळे संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण कोकणातील गर्द जंगलं, तलाव आणि दुर्गम ठिकाणी करण्यात आलं आहे… दिलीप प्रभावळकरांनी दशावतार हा चित्रपट आणि त्यातील त्यांचं पात्र जीवंत केलं आणि स्वत: जगले देखील आहेत…विविध प्रकारच्या वेशभूषा, आव्हानात्मक लोकेशन्स आणि नुकताच होऊन गेलेला चिकनगुनिया सारखा वेदनादायी आजार या साऱ्या अडथळ्यांवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भूमिकेला, कथेला न्याय देण्याची प्रामाणिकता यामुळेच दिलीप प्रभावळकर यांनी हे सर्व सक्षमपणे पार पाडलं आहे…(Marathi entertainment news)
====================================
हे देखील वाचा : Dashavatar Movie Review : माणसातला अवतार दाखवणारा ‘दशावतार’
====================================
दरम्यान, दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की, “‘दशावतार’ चित्रपटातील बाबुली हे पात्र विभिन्न छटा असलेलं पात्र होतं… एक कलावंत, एक बाप आणि बरंच काही. त्यामुळे मला हे जबरदस्त आव्हान वाटलं. ॲक्शन सीन्स करताना थोडी भीती होती परंतु सुबोध सारख्या नव्या दिग्दर्शकाकडून बरंच नवं काही शिकता आलं. या वयात असा अनुभव घेणं हे एक वेगळं थ्रील होतं. त्यामुळे ‘दशावतार‘ मधील भूमिका ही माझ्यासाठी अनोखी सफर आणि अविस्मरणीय आठवण आहे.’’ (Bollywood)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi