‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Shaitaan to Animal : नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेले गेलेले हिंदी चित्रपट!
मराठी किंवा हिंदी कुठल्याही भाषेतला आपला आवडता चित्रपट जर का पाहायला असेल तर आदी तो केबल टीव्हीवर कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहावी लागत होती… कालांतराने प्रेक्षकाची ही समस्या ओटीटीने दुर केली… आता प्रेक्षकांना कोणताही चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहायला मिळतो… थिएटर गाजवल्यानंतर काही दिवसांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो… सध्या बरेच हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिकवेळा पाहिले जात आहेत… जाणून घेऊयात त्या चित्रपटांबद्दल….

जवान
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असणारा ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये तुफान गाजला… बॉक्स ऑफिसवरही ३५० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रटाला ओटीटीवर विशेष प्रेम मिळत आहे… ३० वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला… आणि हाच चित्रपट नेटफ्लिक्सवर सध्या हा ३१.९० मिलियन लोकं पाहत आहेत… (Shah Rukh Khan Movies)

गंगूबाई काठियावाडी
आलिया भट्ट हिला ज्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट प्रेक्षकांना आजही तितकाच आवडतो… संजय लीला भन्साळींचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सध्या २९.६४ मिलियन इतकी लोकं पाहत आहेत. (Alia Bhatt Movies)

अॅनिमल
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ने बॉलिवूडमध्ये अतिरक्तरंजित चित्रपटाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली असं नक्कीच म्हणावं लागेल… बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर. बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांच्या अभिनयाने चार चांद लागले होते.. सध्या २९.२० मिलियन लोकं हा चित्रपट नेफ्लिक्सवर हा चित्रपट पाहत आहेत. (Ranbir Kapoor movies)

लापता लेडीज
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये गाजलेल्या ‘लापता लेडिज’ चित्रपटाने प्रेक्षकांना समाजाचं एक वेगळं रुप दाखवलं होतं… किरण राव दिग्दर्शित लापता लेडिज चित्रपट स्त्री प्रधान चित्रपटांच्या यादीतील एक सुपरहिट चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवरही बऱ्यापैकी कामगिरी करणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २९.५० मिलियन लोकं पाहात आहेत… (Kiran Rao movies)

Crew
तब्बू, करीना कपूर व किर्ती सेनॉन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला Cew हा चित्रपट निव्वळ एन्टरटेनिंग आहे… २९ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २७.९० मिलियन लोकं पाहात असून लोकांची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे… (Kareena Kapoor-Khan)

शैतान
अजय देवगण, आर. माधवन व ज्योतिका यांचा ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळ्याच जगात घेऊन जातो… माधवनचा अभिनय तर लोकांना वेड लावून गेला आहे… थिएटर गाजवणारा ‘शैतान’ नेटफ्लिक्सवर २४ मिलियन लोकं पाहात आहेत आणि नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या १० चित्रपटांच्या यादीत याचा समावेश आहे… (Ajay Devgan movies)
================================
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi