Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Bollywood : लग्न न करताच झाली ही अभिनेत्री आई; लेक आहे बॉलिवूडची सुपरस्टार!
भारतीय चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादरचा डोक्यावर हात नसताना अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून नावारुपास येणं तसं फारसं कठिणच… आजही बॉलिवूडच काय इतर भाषिक चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा स्ट्रगल सुरुच आहे… बरं जुन्या काळातील अनेक अभिनेत्रींचा करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा संघर्ष सुरुच होता… अशीच एक अभिनेत्री होती जिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अडचणींचा सामना केला आणि त्यानंतर इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करणारी तिचीच मुलगी वैयक्तिक जीवनात मात्र एकटीच राहिली… कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊयात… (Bollywood News)

तर, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Rekha) यांची आई पुष्पवल्ली (Pushpavalli) आहे… त्यांचं खरं नाव कंदला वेंकट पुष्पवल्ली तायारू… वयाच्या १२ व्या वर्षी बाल कलाकार म्हणून पुष्पवल्ली यांनी करिअरची सुरुवात केली… १९३६ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटासाठी त्यांना ३०० रुपये मानधन मिळालं होतं आणि त्या काळात ही रक्कम फार मोठी होती… पुढे पुष्पवल्ली यांनी ‘बाला नगाम्मा’, ‘मिस मालिनी’ यांसारख्या चित्रपटांतून मुख्य भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं… तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये जवळपास १८ वर्ष काम केलेल्या पुष्पवल्ली वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या…(Bollywood affiars)

पुष्पवल्ली यांनी १९४० मध्ये तिने आय.व्ही. रंगाचारी या वकिलाशी लग्न केलं… त्यांच्यापासून त्यांना दोन मुलं झाली… पण, ते लग्न फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले… पुढे ‘मिस मालिनी’ चित्रपटामध्ये काम करताना, पुष्पवल्लींची भेट प्रसिद्ध अभिनेता जेमिनी गणेशनशी झाली…. ते आधीच विवाहित होते आणि त्यांना सहा मुलं होती. गणेशन आणि पुष्पवल्ली यांनी लग्न केलं नाही, पण ते एकत्र मात्र राहिले. त्यांना दोन मुली होत्या. रेखा आणि राधा…
================================
हे देखील वाचा : जया, रेखा यांच्याआधी ‘या’ मुलीवर होतं Amitabh Bachchan यांचं प्रेम
=================================
पुष्पवल्लीने मुलगी रेखा यांना चित्रपटसृष्टीत आणलं… आईप्रमाणेच रेखा यांनी देखील बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत वयाच्या १२ व्या वर्षी पदार्पण केलं आणि ‘रंगुला रत्नम’ या तेलुगू चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर रेखा यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि त्यानंतर रेखा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही… एकीकडे हिंदीतील सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रेखा प्रेक्षकांची मनं जिंकत होत्या, मात्र, दुसरीकडे वैयक्तिक जीवनात त्यांना यश काही केल्या मिळत नव्हतं… अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं त्यांचं नातं दिकलं नाही, पुढे उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं पण लग्नाच्या काही महिन्यांनी त्यांनी आत्महत्या केली… बरीच वर्ष चित्रपटांपासून जरी रेखा लांब असल्या तरीही त्यांचा ऑरा आणि त्यांच्यावरील चाहत्यांचं प्रेम काही केल्या कमी झालं नाही आहे…(Rekha news)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi