Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

Ameesha Patel हिने पन्नाशी उलटली तरी लग्न का केलं नाही?
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं करिअर तर घडवलं पण कधी लग्न केलं नाही… बऱ्याचदा वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत त्यांची नावं जोडली गेली पण स्वत:ची वैयक्तिक बाजू त्यांनी कायम सांभाळली… याच काही अभिनेत्रींपैकी एक आहे ती म्हणजे अमिषा पटेल (Ameesha Patel)… ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना देऊ करणाऱ्या अमिषाने बॉलिवूडचा एक काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवला आहे… मात्र, अजूनही तिने लग्न केलं नाही… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने वयाची पन्नाशी पार केली असूनही लग्न न केल्याचं कारण सांगितलं आहे… काय म्हणाली आहे अमिषा जाणून घेऊयात…(Entertainment news)

अलिकडेच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अविवाहित असल्याबद्दल अमिषा म्हणाली की, “मी आजपर्यंत कोणाच्याही मागे-मागे गेले नाही. अगदी शाळेत असल्यापासूनच माझे मागे मुलं असायची पण मी अभ्यासाक़डे लक्ष दिलं. तेव्हाही मला खूप विचारणा झाली आणि आजही होते. पण मी भेटलेल्या अनेक लोकांना मी लग्नानंतर घरीच राहावं आणि काम करू नये अशी इच्छा होती आणि ते मला पटलं नाही. मी माझं बालपण कोणाची तरी मुलगी म्हणून घालवलं. आता तरुणपण कोणाची पत्नी म्हणून असं घालवायचं नाही.” यावेळी अमिषाने तिच्या एका प्रेमाबद्दल कबूली देखील दिली… ती म्हणाली की, “एका मुलावर माझं प्रेम होतं… मात्र, त्याला मी चित्रपटात काम करणं पसंत नव्हतं… त्यावेळी मी प्रेम आणि करिअर यांच्यात करिअरची निवड केली आणि परत कधीच कुणासोबत रिलेशनमध्ये आले नाही”. (Ameesha Patel on marriage)

पुढे अमिषा असं देखी म्हणाली की, “जे लोक तुमच्यावर खरोखर प्रेम करतात ते तुम्हाला कायमच प्रोत्साहन देतील. मी माझ्या करिअरमध्ये खूप काही गमावलं आहे. बऱ्याच वेळा मी एक गोष्ट सोडून दुसरी निवडली आणि दोन्हीकडून लक्षात राहिल असा धडा मिळाला. मी लग्न करायला तयार आहे, फक्त एकच अट आहे की मला योग्य व्यक्ती सापडली पाहिजे. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभा राहिल त्याच्याबद्दल मी नक्कीच विचार करेन. आजही मला चांगल्या घरातील मुलांची स्थळं येतात. पण, मी नेहमी करिअरचा विचार केला.”
================================
हे देखील वाचा : दादा कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ हा सिनेमा स्वत: का बनवला नाही?
=================================
अमिषा पटेल नुकतीच ‘गदर २’ (Gadar 2) मध्ये झळकली होती… गदर : एक प्रेमकथा हा चित्रपट तिच्या करिअरमधला बेस्ट चित्रपट होता… आजवर अमिषाने ‘बद्री’, ‘ये जिंदगी का सफर’, ‘हमराज’, ‘क्रांती’, ‘ये है जलवा’, ‘परवाना’, ‘जमीर’, ‘ऐलान’, ‘भूल भूलैय्या’, ‘मेरे जीवन साथी’, ‘मुन्ना मायकल’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… (Ameesha Patel Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi