
Amitabh Bachchan यांना अमेरिकेतील क्लबने एन्ट्री नाकारली; शक्कल लढवत केलं असं काही की….
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत… वयाची ऐंशी वर्ष उलटून गेली तरी आजही अमिताभ बच्चन यांना प्रमुख पात्र देत त्यांच्या भोवती कथा लिहिली जाते… जर का तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी चक्क बिग बींना काही कारणासाठी नकार देण्यात आला होता तर तुमता विश्वास बसेल का? पण हो अमेरिकेत एका क्लबमध्ये अमिताभ यांना प्रवेश नाकारण्यात आला होता… काय होतं त्याचं कारण जाणून घेऊयात…

अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती १७’ मध्ये हा किस्सा सांगितला… हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने सिगारबद्दल प्रश्न विचारला असता बच्चन यांना अमेरिकेतील एक किस्सा आठवला. ते म्हणाले की, “मी अमेरिकेत होतो आणि रात्री तिथे काही क्लब असायचे जिथे तरुण आणि सेलिब्रिटी डान्स करायचे… या ठिकाणी जाणे खूप कठीण होते. माझ्या मित्रांनी मला सांगितले की, आपण तिथे जाऊ. कसे तरी, आम्ही तिथे पोहोचलो, परंतु बाऊन्सर्सनी आम्हाला हाकलले.” बच्चन यांनी पुढे खुलासा केला की ते तिथेच थांबले नाहीत आणि प्रवेश मिळविण्यासाठी एक योजना आखली… (Bollywood)

अमिताभ पुढे म्हणाले की, “मी एक प्रॅन्क करण्याचा विचार केला. तिथे लिमोझिन नावाच्या मोठ्या गाड्या असतात आणि जो कोणी त्यात येतो त्याला खूप आदराने वागवले जाते. आम्ही काही पैसे गोळा केले, एक लिमोझिन भाड्याने घेतली, कपडे घातले आणि क्लबमध्ये गेलो. मी आत जाण्यापूर्वी, मी माझ्या हातात एक सिगार धरला होता. त्यांनी मला एक मोठा माणूस समजून माझे स्वागत केले आणि आम्ही आत गेलो.” हा किस्सा ऐकून संपूर्ण प्रेक्षकांसह अमिताभ बच्चन यांनाही हसू आवरले नाही…(Amitabh Bachchan news)
================================
================================
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते ‘द इंटर्न’ (The Intern) या चित्रपटात दिसणार आहेत… आधी त्यांच्यासोबत या चित्रपटात दीपिका पादूकोण (Deepika Padukone) दिसणार होती; मात्र, तिने या चित्रपटातून माघार घेतल्यामुळे आता नवी अभिनेत्री त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे…. यासोबतच बिग बी ‘कल्की २’, ‘ब्रम्हास्त्र २’ (Kalki 2 and Bramhastra 2) मध्ये देखील झळकणार आहेत… (Amitabh Bachchan Upcoming movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathib