Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

पद्मश्री Mohanlal यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर!
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्काराने यंदा साऊथ सुपरस्टार पद्मश्री मोहनलाल (Mohanlal) यांना केंद्रीय सरकारने जाहिर केला आहे. आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.. ३ दशकांपेशक्षा अधिक काळ नोरंजनसृष्टीत आपलं अमुल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला असून येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. (Mohanlal award news)

मोहनलाल यांनी १९७८ मध्ये Thiranottam या मल्याळम चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती… मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला होता… त्यामुळे चित्रपटातील त्यांचा ऑन स्क्रीन डेब्यु चित्रपट १९८० साली आला होता ज्याचं नाव होतं Manjil Virinja Pokkal असं होतं आणि या चित्रपटात त्यांनी खलनायक साकारला होता… मोहनलाल यांची एक खासियत म्हणजे त्यांना भारतीय लष्कराकडून लेफ्टनंट कर्नल पद दिले गेले होते आणि हे पद मिळवणारे ते पहिले अभिनेते आहेत… इतकंच नाही तर मोहनलाल यांनी एका वर्षात चक्क ३४ चित्रपटांमध्ये कामं केली होती आणि त्यापैकी २५ चित्रपट हिट झाले होते… (Mohanlal journey)

शालेय जीवनापासूनच मोहनलाल यांना अभिनयाची आवड होती… शाळेत नाटकांमध्ये ते सहभाग घेत असत… शाळेत त्यांनी कॉम्प्युटर बॉय या एका नाटकात काम केले होते ज्यात त्यांनी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम केलं होतं आणि तेव्हा ते सहावीत शिकत होते… उत्कृष्ट अभिनयासोबतच मोहनलाल कुस्तीपटूही होते… १९७७ ते १९७८ या दरम्यान ते केरळ राज्य कुस्ती चॅम्पियन होते… चित्रपटांच्या आवडीमुळे त्यांनी कुस्तीत आपलं करिअर केलं नाही…
================================
हे देखील वाचा : Drishyam : मोहनलालच्या दृश्यम ३ चा फटका अजय देवगणच्या दृश्यमला लागणार?
================================
मोहनलाल यांनी आजवर ‘योद्धा’, ‘मणिचित्राथाजू’, ‘विलेन’, ‘दृष्यम’, ‘ओप्पम’, ‘ग्रॅंडमास्टर’, ‘नरसिम्हा’, ‘एम्पुरन’, ‘वॉर ऑन टेरर खांदार’, ‘Thudarum’ अशा ३५० पेक्षा अधिक बऱ्याच चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत… मोहनलाल यांच्याबद्दल आणखी एक महत्वाची बाब म्हणजे १९८६ मध्ये दर १५ दिवसांनी त्यांचे चित्रपट रिलीज होत होते… यशाच्या शिखरावर असणाऱ्या मोहनलाल यांच्या अभिनयाचे चाहते सर्व वयोगटातील प्रेक्षक होते आणि आजही आहेत… अभिनयासोबतच मोहनलाल चित्रपट निर्मिती आणि हॉटेल क्षेत्रातही कार्यरत आहेत… मोहनलाल यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार, ९ केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांच्या कारकीर्दीच्या गौरव म्हणून त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्रीने गौरव केला आहे. (Mohanlal movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi