Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Vada Paav Trailer: भावनांची आणि नात्यांची तिखट चव असलेल्या ‘वडापाव’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित !
सध्या संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एका नावाचीच जोरदार चर्चा सुरू आहे, आणि ते नाव आहे ‘वडापाव’. टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. आता नुकताच लाँच झालेला धमाकेदार ट्रेलर या उत्सुकतेला अधिकच उधाण देतोय. या ट्रेलर लाँच सोहळ्याला महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांची खास उपस्थिती लाभली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच लक्षवेधी ठरला. ‘वडापाव’ चित्रपट केवळ एक खाद्यपदार्थाच्या नावावर आधारित नसून, तो विविध नात्यांची, भावना आणि आयुष्यातील गोड–तिखट क्षणांची गोष्ट सांगतो. ट्रेलरमध्ये कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंत, हृदयस्पर्शी प्रसंग आणि हलक्याफुलक्या हास्याचा समतोल दिसतो, जो प्रेक्षकांच्या मनाला नक्की भिडतो. हा सिनेमा प्रेक्षकांना हसवतानाच डोळ्यात पाणी आणणाऱ्या भावना देखील देणार आहे, हे ट्रेलरवरूनच स्पष्ट होतं.(Vada Paav Movie Trailer)

रितेश देशमुख यांनी ट्रेलर पाहिल्यानंतर ‘वडापाव’चं प्रेक्षकांवर गारूड नक्कीच होईल, असं सांगितलं. त्यांना ट्रेलर पाहताना स्वतःच्या तोंडाला पाणी सुटलं, असंही त्यांनी सांगितलं. प्रसाद ओक यांच्या दिग्दर्शनाचं त्यांनी खास कौतुक केलं आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्यांनी नेहमीच उत्तम दर्जा कायम राखल्याचं नमूद केलं. अमेय खोपकर यांच्याबद्दल बोलताना, त्यांनी मराठी सिनेमासाठी झटणारा एक सच्चा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी गौरवोद्गारात सांगितलं. दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी ‘वडापाव’ या चित्रपटाला भावनांची आणि नात्यांची चव असल्याचं म्हटलं. त्यांनी सांगितलं की, चित्रपट प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर अनेक प्रसंगांमधून डोळ्यांत पाणी आणेल आणि नातेसंबंधांबाबत नव्याने विचार करायला लावेल. रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमुळे ट्रेलर लाँच अधिक खास झाला आणि त्यांचं मनोबलही वाढलं, असं त्यांनी म्हटलं.

चित्रपटाचे निर्माते अमेय विनोद खोपकर यांनी ट्रेलर लाँच कार्यक्रम अविस्मरणीय झाल्याचं सांगत, ‘वडापाव’ची कथा प्रत्येक घराच्या आयुष्यात पोहोचेल, आणि नात्यांची खरी चव प्रेक्षक अनुभवतील, असा विश्वास व्यक्त केला. निनाद बत्तीन यांनी ‘वडापाव’ ही एक तिखट–गोड प्रेमकहाणी असल्याचं सांगत, प्रेम, नातं आणि विनोद यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना नक्की भावेल, असं मत मांडलं. अमित बस्नेत यांनीही चित्रपटाच्या चविष्ट प्रवासाचं वर्णन करत, ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावरून चित्रपटालाही भरभरून प्रेम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.(Vada Paav Movie Trailer)
==============================
===============================
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे हे कलाकार आपल्या अभिनयाने सजणार आहेत. ‘वडापाव’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.