Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

71st National Film Awards: मराठी बालकलाकारांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डंका!
भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच दिंल्लीत संपन्न झाला… राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणात आला… यावेळी मराठी चित्रपट आणि मराठी बालकलाकारांनी बाजी मारली असून प्रेक्षकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे… जाणून घेऊयात ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षण…

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि कलाकृतींनी एकूण ५ पुरस्कार जिंकले असून, अवघ्या मराठी सिनेमविश्वासाठी हा अभिमानाचा क्षण आहे… महत्वाचं म्हणजे १९५३ साली रिलीज झालेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटाने १९५४ मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता… आणि आता पुन्हा एकदा सुजय डहाके दिग्दर्शक ‘श्यामची आई’ (२०२३) चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं आहे…

दिग्दर्शक आशिष बेंडेच्या ‘आत्मपॅम्फलेट’ हा पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटासाठी त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला… तर, ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपट’चा पुरस्कार ‘नाळ २’ ला, ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ हा पुरस्कार ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’तील तृषा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला. तर ‘जिप्सी’ या चित्रपटातील कबीर खंदारे या चिमुरड्यानेही ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकारा’चा पुरस्कार पटकावला…
तर ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ हा पुरस्कार जिंकण्याचा मान ‘श्यामची आई’ या चित्रपटाला मिळाला असून निर्मात्या अमृता राव आणि दिग्दर्शक सुजय डहाकेने राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला… दरम्यान, सुजय डहाकेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे…

तर, शाहरुख खान, राणी मुखर्जी, करण जोहर, विक्रात मेस्सी यांना हिंदी चित्रपटसृष्टीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे… शिवाय, दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi