Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकत्र! स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळीत करणार धमाल जुगलबंदी…
सणांची खूप मजा त्या वेळी दुपटीत होते जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. गणेशोत्सवाच्या जल्लोषानंतर आता स्टार प्रवाह परिवार तयार आहे, आपल्या ढिंचॅक दिवाळी साजरी करण्यासाठी. फराळासोबतच अशाच तिखट-गोड विनोदाचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजी सारखे चमकदार कलाकारांचे परफॉर्मन्स दिवाळीच्या विशेष कार्यक्रमाला आणखी अधिक खास करणार आहेत.(Nilesh Sable & Bhau Kadam)

स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच यंदाची दिवाळी रंगवायला येणार आहे एक नवीन जोडी. विनोदाची अचूक सुसंवादाची शैली आणि हसण्याचा धमाका घेऊन महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) हे दोघंही प्रेक्षकांना हसवण्यासाठी येत आहेत. डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांना एकत्र पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरून राहिला आहे. आता अखेर या जोडीची प्रतीक्षा संपणार आहे. स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने, हे दोघं पुन्हा एकत्र येणार आहेत. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला समोर ठेवून, भाऊ कदम आणि निलेश साबळे हे देखील याविषयी फारच उत्साही आहेत.

निलेश साबळे म्हणाले, “खूप दिवसांपासून प्रेक्षकांनी आमची जोडी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी आणि भाऊ कदम स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात एक खास धमाल घेऊन येणार आहोत. भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते. भाऊला मी समजून घेतो आणि तो मला समजून घेतो. गेली १५ वर्षे आम्ही एकत्र काम करत आहोत. भाऊ कदम आपल्या प्रत्येक भूमिकेला खास बनवतो. या कार्यक्रमातही प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल याची मला खात्री आहे.”(Nilesh Sable & Bhau Kadam)
==========================
==========================
भाऊ कदम म्हणाले, “यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच काम करत असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे. निलेश साबळेसोबत अनेक वर्षांची मैत्री आहे, आणि तीच मैत्री या कार्यक्रमात एक वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना दाखवायला मिळणार आहे. दिवाळीला हास्याचा फराळ सादर करत आहोत, तर नक्कीच १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर हे खास कार्यक्रम पाहायला विसरू नका!”