
Mahesh Manjrekar यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं २५ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झालं… त्यांच्या निधनामुळे मांजरेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे… दीपा मेहता या सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर होत्या… त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण मांजरेकर कुटुंब शोकाकुळ झालं आहे..
महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांना अश्वमी आणि सत्या मांजरेकर ही दोन अपत्य आहेत… आईच्या निधनानंतर सत्या मांजरेकरने सोशल मिडियावर आईचा फोटो टाकून मिस यु मम्मा म्हणत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे…

महेश मांजरेकर आणि दीपा मेहता एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते… दोघांनी १९८७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर अश्वमी आणि सत्या यांचा जन्म झाला आणि १९९५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता… दीपा (deepa Mehta) या फॅशन डिझायनर असून त्यांचा स्वत:चा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रँड चालवत असत. त्यांची लेक अश्वमी या ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते. तसेच, दीपा मेहता यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी मेधा यांच्याशी लग्नगाठ बांधली… मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई ही एकच मुलगी आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi