Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!
बहुप्रतिक्षित ‘कांतारा : अ लेजेंड- चॅप्टर १’ (Kantara : A Legend – Chapter 1) या ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने देशभरात धुमाकूळ घातला आहे… २०२२ मध्ये रिलीज झालेला ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाचा हा प्रिक्वेल असून प्रेक्षकांनी या भागालाही तितकंच किंबहूना अधिक प्रेम दिलं आहे… २०२५ या वर्षातील बऱ्याच हिंदी-साऊथ सुपरहिट चित्रपटांना ‘कांतारा ‘१ ने पहिल्याच दिवशी धुळ चारली आहे… तसेच, २०२५ मधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे… (Rishabh Shetty Movie)

तर, सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘कांतारा : अ लेजेंड- चॅप्टर १’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६० कोटी कमवून एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे… यात कन्नड भाषेत १८ कोटी, तेलुगू भाषेत १२.५ कोटी, हिंदी भाषेत १९.५ कोटी, तमिळ भाषेत ५.२५ कोटी आणि मल्याळम भाषेत ४.७५ कोटी कमावले आहेत… १२५ कोटींचं बजेट असणाऱ्या ‘कांतारा १’ च्या हिंदी वर्जनने आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्या चित्रपटांनाही मागे टाकलं असून हा कन्नड चित्रपट २०२५ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे… २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कांतारा’ चित्रपटाने अवघ्या १६ कोटींच्या बजेटसह ४०७ कोटींचा टप्पा पार केला होता… (Kantara 1 box office collection day 1)
================================
हे देखील वाचा : Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !
=================================
‘कांतारा : अ लेजेंड- चॅप्टर १’ हा भाग प्रेक्षकांना १ हजार वर्ष मागे नेतो, जिथे या परंपरेची सुरुवात झाली होती. कदंब साम्राज्यातील बांगरा हे राजघराणे, त्याच्या बाजूला असलेलं घनदाट जंगल आणि त्या जंगलात राहणारे कांतारा भूमीचे लोकं, त्यांचं श्रद्धास्थान आणि त्याच जंगलात राहणाऱ्या कडपा या आदिवासी जमातीचे लोकं या सर्वांभोवती ही कथा फिरते. प्रत्येक साम्राज्यात एक दुष्ट राजा घडलेलाच असतो. तसाच या बांगरा घराण्यातही असतो. दुसरीकडे कांतारा भूमीचा नायक आहे बेर्मे… म्हणजेच ऋषभ शेट्टी ! त्याचा रहस्यमयी जन्म, तो कशाप्रकारे कांतारा भूमीच्या लोकांना वाचवतो, हे सगळं यात दाखवलं आहे. आता कांतारा (२०२२) चित्रपटाचा ३०० कोटींचा टप्पा हा चित्रपट पार करेल असं चित्र नक्कीच दिसून येत असून कन्नडा चित्रपटासाठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार ऋषभ शेट्टी नानवावर करेल का याकडै सगळ्यांचं लक्ष आहे… (Kannada movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi