‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Marathi Movie 2025 : श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’
कोकणातील लोककलेवर आधारित ‘दशावतार’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत… तर, दुसरीकडे कांतारा १ या कन्नड चित्रपटाने संस्कृती आणि आपल्या देवाचं एक वेगलंच जग लोकांसमोर मांडलं आहे.. आता आणखी एका मराठी चित्रपटातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणार आहे… ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात ‘कांतारा’ (Kantara 1) मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठे स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे. ‘गोंधळ’ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे. (Gondhal marathi movie)

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यांचा सुंदर संगम यात दिसत आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी वेगळंच रहस्य घेऊन येते, असं टिझरमधून दिसते.
================================
हे देखील वाचा : Kantara 1 चा जगभरात वाजला डंका; ८ दिवसांत पार केला ५०० कोटींचा आकडा
================================
डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi