‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश मापुस्कर!
आजवर हनुमानावर बरेच चित्रपट, सीरीज आणि अॅनिमेटेड सीरीजही आल्या… परंतु, पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत AIचा वापर करत हनुमानावर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर (Rajesh Mapuskar) करणार आहेत… Chiranjeevi Hanuman- The Eternal असं या चित्रपटाचं नाव असून सनातन धर्मातील लेजेंड हनुमानाचं जीवन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना मापुस्करांच्या एक वेगळ्याच नजरेतून पाहता येणार आहे…. (Entertainment News)

‘वेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या राजेश मापुस्कर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या हिंदु संस्कृतीचं निराळ दर्शन लोकांसमोर मांडणार आहेत… Chiranjeevi Hanuman- The Eternal या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा करणार असून जगभरात हा हिंदी भाषिक चित्रपट २०२६ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी रिलीज केला जाणार आहे… (Rajesh Mapuskar Movies)
================================
हे देखील वाचा : Ramayana वर आधारित दाक्षिणात्य कलाकृतींचा भांडार!
================================
राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या राजेश मापुस्करांनी ‘फेरारी की सवारी’ (Ferrari Ki Sawari) या चित्रपटाने दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आपला फिल्मी इंडस्ट्रीतला प्रवास सुरु केला होता… त्याआधी दिग्दर्शक राजकूमार हिरानी यांच्या ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी त्यांनी Chief Associate Director म्हणून काम केलं होतं… तसेच ‘वेंटिलेटर’, ‘रुद्रा’ आणि ‘येक नंबर’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या मापुस्करांनी आत्तापर्यंत असंख्य जाहिरातींचं दिग्दर्शन केलं आहे… त्यामुळेच प्रेक्षकांना आता इतर पौराणिक चित्रपटांच्या यादीत Chiranjeevi Hanuman- The Eternal या चित्रपटाचं अॅडिशन करण्याची वेळ आली असून AI च्या माध्यमातून तयार केला जाणारा हा चित्रपट कसा असणार याची उस्तुकता सगळ्यांनाच लागली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi