‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
मराठी टेलिव्हिजनवर दरवेळी नवनवीन मालिकांचे आगमन होत असते, आणि त्या अनुषंगाने “काजळमाया” ही नवी आणि रोमांचक हॉरर मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “नशीबवान” आणि “लपंडाव” या मालिकांच्या यशानंतर आता “काजळमाया” हा नवा जॉनर प्रेक्षकांसमोर आहे. हॉरर ड्रामा असलेल्या या मालिकेचा प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षेने वाट पाहत होता, पण मालिकेच्या रिलिज डेट नंतर काही बदल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. ‘काजळमाया’ या मालिकेचे प्रीमियर 27 ऑक्टोबरपासून होणार असून, प्रत्येक रात्री 10:30 वाजता ही मालिका सुरू होईल. पण या मालिकेच्या आगमनामुळे “तू ही रे माझा मितवा” या लोकप्रिय मालिकेच्या वेळेवर परिणाम होणार आहे. काही प्रेक्षकांनी आता प्रश्न पडला आहे की , “‘काजळमाया” सुरू होणार म्हणजे “तू ही रे माझा मितवा” संपणार का?‘(Kajalmaaya Marathi serial)

तर “तू ही रे माझा मितवा” या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे, त्यामुळे मालिकेचे चाहते सुखद धक्का अनुभवणार आहेत. आता ही मालिका रात्री 8 वाजता प्रसारित होईल, त्यानंतर “काजळमाया” रात्री 10:30 वाजता सुरू होईल. मात्र, या बदलामुळे काही प्रेक्षकांना एक नवा प्रश्न पडला आहे. “तू ही रे माझा मितवा” चे वेळ बदलल्यामुळे 8 वाजता लागणारी “कोण होतीस तू काय झालीस तू” ही मालिका ही वेळ बदलणार की बंद होणार? या प्रश्नावर, नवी माहिती अशी आहे की, “कोण होतीस तू काय झालीस तू” या मालिकेची वेळही बदलली आहे.

पूर्वी 8 वाजता प्रसारित होणारी ही मालिका आता रात्री 11 वाजता दाखवली जाईल. त्यामुळे, जरी मालिकेच्या वेळा बदलल्या आहेत, तरी “कोण होतीस तू काय झालीस तू” देखील संपणार नाही, फक्त तिची प्रसारण वेळ उशीराने होईल. मालिकेच्या वेळांमध्ये बदल झाल्यामुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे, विशेषत: “कोण होतीस तू काय झालीस तू” यांच्या चाहत्यांनी. 11 वाजता ती मालिका सुरू होणे काही प्रेक्षकांना परवडणारे ठरणार नाही, कारणरात्री ११ म्हणजे खूपच उशीराची वेळ या मालिकेसाठी निवडण्यात आलेली आहे.(Kajalmaaya Marathi serial)
============================
============================
या मालिकांच्या वेगवेगळ्या वेळा निश्चितच काही प्रेक्षकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतात, पण “काजळमाया” एक नवा आणि वेगळा अनुभव घेऊन येत आहे. अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर, आणि रुची जाईल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने हॉरर जॉनरमध्ये एक नवा प्रयोग केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना थरारक आणि भुताच्या जगात घेऊन जाणारी एक विस्मयकारक कथा पाहायला मिळेल. काय घडेल, हे सर्व प्रेक्षकांच्या आवडीनुसार ठरेल, पण एक गोष्ट नक्की आहे की “काजळमाया” आणि त्याचे नविन प्रयोग मराठी टेलिव्हिजनच्या विश्वात एक ताजं वळण घेऊन येणार आहे.