स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?
‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter 1) चित्रपटाने साऊथ आणि बॉलिवूडच्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे… ऋषभ शेट्टीने जगभरात ५५० कोटींचा टप्पा पार केला असून देशात ५०० कोटींकडे या चित्रपटाने वाटचाल सुरु केली आहे… पंजूर्ली आणि गुलिगा देवतांची दंतकथा आणि कदंब साम्राज्य नेमकं कसं होतं? असा तब्बल हजारो वर्षांचा इतिहास कांतारा १ मध्ये दाखवण्यात आला आहे… २०२२ मध्ये रिलीज झालेल्या कांताराचा हा प्रीक्वेल असून थिएटर्समध्ये गोंधळ घालणारा ‘कांतारा १’ आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे… कधी, कुठे? जाणून घेऊयात…

तर, सर्वसाधारणपणे साऊथचे चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर ओटीटीवर रिलीज केले जातात… त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झालेला ‘कांतारा १’ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होईल असं प्रेक्षकांना वाटलं होतं…मात्र, ‘कांतारा १’ ची ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे… 9Kantara 1 OTT release)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ सुरुवातीला ३० ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा हा चित्रपट इतक्यात ओटीटीवर न आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे… रिपोर्ट्सनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ हिंदीमध्येही रिलीज झाला असून कोणताही हिंदी चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनीच ओटीटीवर येतो. त्यामुळे ‘कांतारा चॅप्टर १’ नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट Amazon Prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश मापुस्कर!
================================
दरम्यान, कांतारा १ च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या चित्रपटाने ४६५.२५ कोटी कमावले आहेत… इतकंच नाही तर, कांतारा १ ने ‘सलार’ चित्रपटाचं लाईफटाईम कलेक्शन ४०६.४५ आणि ‘बाहुबली १’ चं लाईफटाईम कलेक्शन ४६० कोटी पार केलं आहे… त्यामुळे आता लवकरच ‘कांतारा १’ चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करत कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरणार हे निश्चित आहे… (Rishabh Shetty Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi