स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) दिग्दर्शित आणि अभिनित ‘मना’चे श्लोक’ चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता… रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथाचा अपमान केला असा आक्षेप काही संघटनांनी घेतला होता… खरं तर या चित्रपटाच्या नावाचा आणि रामदास स्वामींच्या ग्रंथाचा काही संबंध नसूनही लोकांच्या विरोधाला शांत करण्यासाठी अखेर मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं असून या नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. (Marathi movie Manache Shlok)

दरम्यान, मृण्मयी देशपांडेच्या चित्रपटाचं आधी नाव ‘मना’चे श्लोक’ असं होतं… परंतु, सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला होता… या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी आता चित्रपटाचं नाव बदलून ‘तू बोल ना’ असं केली आहे…(Tu Bol Na movie)
================================
हे देखील वाचा : Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; धमाकेदार ट्रेलर रिलीज
================================
या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे मातब्बर कलाकार आहेत… तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असून ‘तू बोल ना’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा रिलीज होणार आहे…. (Marathi movie 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi