Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Shah Rukh Khan याने ‘दीवाना’ चित्रपट स्वीकारताना कोणती अट ठेवली होती?
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) याचा आज ६०वा वाढदिवस… दीवाना ते अलीकडचा पठाण असे १०० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखची फिल्मी जर्नी खरंच नवोदित कलाकारांना प्रेरणा दजेणारी आहे.. दिल्ली ते मुंबईचा प्रवास करणाऱ्या शाहरुखने जगभरात आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे… पण तुम्हाला माहित आहे का १९९२ मध्ये ‘दीवाना’ (Deewana Movie) या त्याच्या डेब्यु चित्रपटासाठी त्याने एक अट ठेवली होती.. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात…

शाहरुख खान याचा ‘दीवाना’ हा चित्रपट १९९२ मध्ये रिलीज झाला होता… याच ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य भूमिकेत होते… खरं तर बरेच चित्रपट शाहरुखने साईन केले होते पण रिलीज होणारा हा त्याचा पहिला चित्रपट ठरला… या चित्रपटाचे निर्माते गुड्डू धनोआ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ”जेव्हा मी शाहरुखशी माझ्या ‘दीवाना’ चित्रपटासाठी संपर्क साधला, तेव्हा त्याच्याकडे आधीच पाच चित्रपट होते. त्याने आम्हाला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावलं. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्यासोबत मीटिंग झाली, तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे तर तारखाच नाही आहेत. मी विचारले की, तू असे काय करत आहेस? तेव्हा त्याने सांगितले की, मी पाच चित्रपट करत आहे. मग मी त्याला म्हणालो की, तु चित्रपटाची कथा तरी ऐक…” (Entertainment News)

पुढे धनोआ म्हणाले की, ‘दीवाना’ची कथा ऐकवण्यासाठी शाहरुखने दुसऱ्या दिवशी आपल्या घरी बोलावले. त्याच्या घरी कथेचा सेकंड हाफ ऐकल्यानंतर तो म्हणाला की, “गुड्डू मी हा चित्रपट करतोय. मी त्याला ११ हजार रुपये साइनिंग अमाऊंट दिली. त्यावेळी त्याने मला सांगितले होते की, ‘या पाचही चित्रपटांमधून कोणाची तारीख कॅन्सल झाली, तरच मी तुमच्या चित्रपटासाठी तारीख देऊ शकेन.’ त्यानंतर एक दिवस आम्हाला त्याच्याकडून फोन आला की, ‘राजू बन गया जेंटलमैन’ चित्रपटाचं २० दिवसांचे शूटिंग शेड्यूल कॅन्सल झाले आहे. आम्ही प्लॅन केला आणि दीवानाची शूटिंग सुरू केली”… (Shah Rukh Khan Movies)

म्हणतात ना सगळं काही नशीबावर अवलंबून असतं… ज्या चित्रपटासाठी शाहरुख खानने तारखा नसल्यामुळे रिजेक्ट केलं होतं, त्याच चित्रपटामुळे त्याचं नशीब उजळवलं… धनोआ असं देखील म्हणाले की, “यात कोणतीही रणनीती नव्हती, आमचा चित्रपट सर्वात आधी बनला होता, म्हणून सर्वात आधी प्रदर्शित झाला. त्यावेळी कोणीतरी मला सांगितले होते की, शाहरुखचा निर्मात्यांशी करार आहे की त्यांचा ‘राजू बन गया जेंटलमैन’ हा चित्रपट सर्वात आधी प्रदर्शित होईल”… यावर शाहरुखशी बोलणं झाल्यानंतर तो म्हणाला होता की, “जर तुमचा चित्रपट तयार असेल, तर तुम्ही सर्वात आधी तो प्रदर्शित करा.”

‘दीवाना ‘चित्रपटाची कथा जितकी प्रेक्षकांना आवडली तितकंच प्रेम चित्रपटातील गाण्यांवरही लोकांनी केलं… ए.आर.रेहमान (A.R.Rehman) यांच्या संगीताची जादू गेले अनेक वर्ष आपण अनुभवोय पण त्यावेळी दीवाना चित्रपटातील प्रत्येक गाण्याने तरुणाई वेडी झाली होती… शाहरुख खानचे आजही प्रत्येक वयोगटातील चाहते आहेत… इंडस्ट्रीत एक टर्म फार वापरली जाते ती म्हणजे आऊटसाईडर… तर याच आऊटसाईडर शाहरुखने इंडस्ट्रीतल्या नेपोकिड्सला देखील मागे टाकत स्वत:चं जग आणि अस्तित्व तयार केलं…
================================
हे देखील वाचा : Sushmita Sen to Raveena Tondon : ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी दत्तक घेतल्या आहेत मुली
================================
लवकरच शाहरुख ‘किंग’ (King Movie) या चित्रपटात दिसणार असून त्याच्या वाढदिवसानिमित्त पहिली झलक रिलीज करण्यात आली आहे… या चित्रपटात शाहरुख खानसोबत सुहाना खान, अभिषेक बच्चन, दीपिका पादूकोण, राणी मुखर्जी हे कलाकार दिसणार असं सांगितलं जात आहे…(Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi