Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Kamal Haasan Birthday : असा अभिनेता पुन्हा होणे नाही!
मध्यंतरी इन्स्टाग्रामच्या रिल्सवर एक गाणं फार फेमस झालं होतं ते म्हणजे ‘कनमनी, अनबोदु काधलन….’ मुळ तमिळ भाषेतल्या या गाण्याने मिलेनियल आणि Gen Z पोरांनाही पार वेडं केलं होतं… १९९१ मध्ये आलेल्या या गाण्याची क्रेझ २०२५ पर्यंत अगदी ताजीतवानी ठेवणारे आणि यंग कलाकारांनाही लाजवेल असे अॅक्शन सीन्स आणि चित्रपट देणारे ग्रेट कलाकार म्हणजे पद्मभूषण कमल हासन…. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास सुरु केला आणि बघता बघता ६० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी केवळ तमिळ फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर इतर भाषांमध्येही गाजवला… आज वाढदिवसानिमित्त कमल हासन यांच्या काही युनिक गोष्टी जाणून घेऊयात… (Kamal Haasan Birthday Special)

तर, १९६० मध्ये वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी कमल हासन यांनी ‘कलाथूर कन्नम्मा’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली आणि पहिल्याच पदार्पणात थेट राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्का मारला… इतकंच नाही तर, कमल हासन केवळ उत्कृष्ट अभिनेतेच नसून डान्सर, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार आणि मेकअप आर्टिस्टही आहेत. आणि त्यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकारात विशारद देखील केल्याचं फार कमी जणांना माहित आहे… खरं तर तमिळ चित्रपटसृष्टीत आधुनिक टॅक्नोलॉजी याच विश्वनायकाने आणली आणि युएसएमध्ये जाणून प्रॉस्थॅटिक्सचा वापर चित्रपटांमध्ये मेकअप करताना कसा करतात याचं शिक्षणही त्यांनी घेतलं…(Tamil Movies and Kamal Haasan)
कमल हासन हे एकमेव भारतीय अभिनेते आहेत ज्यांनी तब्बल २० फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले आहेत. आणि विशेष म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नडा या ५ भाषांमध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारेसुद्धा ते एकमेव अभिनेते आहेत… इतकंच नाही तर, १९९४ मध्ये एका चित्रपटासाठी १ कोटी मानधन घेणारे ते पहिले तमिळ अभिनेते होते… त्याकाळी १९७० ते १९८७ या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या नावावर १ कोटी मानधन घेण्याचा रेकॉर्ड होता… आणि त्यानंतर १९८८ ते १९९८ मध्ये कमल हासन आणि रजनीकांत या दोन तमिळ सुपरस्टार्सने जगभरात तमिळ चित्रपटसृष्टी पोहोचवत सर्वाधिक मानधन घेण्याचा बहुमान मिळवला होता…

तसेच, जवळपास ६४ वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या कमल हासन यांचे ७ चित्रपट ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरीसाठी भारताकडून पाठवण्यात आले आहेत… आणि महत्वाचं म्हणजे १९८५ मध्ये आलेल्या ‘सागर’ या चित्रपटासाठी बेस्ट लीडिंग रोल आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर असे दोन नॉमिनेशन मिळवणारे कमल हासन हे एकमेव अभिनेते आहेत… तसेच, हासन हे पद्मभूषण इलैय्याराजा आणि जॅकी चॅन यांचे खूप मोठे चाहते आहेत… त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये जॅकी चॅनसारखे स्टंट्स करताना आपल्या करिअरमध्ये ३२ वेळा त्यांना फ्रॅक्चर देखील झालं आहे…

कमल हासन यांनी आजवर २५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली असून रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटासाठी १९९९ मध्ये आधी हासन आणि प्रिती झिंटाची निवड झाली होती हे कदाचित फार लोकांना माहित नसेल….त्यांनी फोटोशूटसुद्धा केले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे चित्रपट होऊ शकला नाही आणि पुढे यामध्ये रजनीकांत आणि ऐश्वर्या राय झळकले होते….
================================
हे देखील वाचा : Vishnudas Bhave : मराठी रंगभूमीवरील पहिल्या ‘सीता स्वयंवर’ नाटकामुळेच घडला इतिहास….
================================
कमल हासन यांच्या चित्रपटांनी इतिहास रचला आहे… १९८२ मध्ये त्यांच्या ५ चित्रपटांनी सिल्वर जुब्ली केली होती… इतकंच नाही तर, १९७८ मध्ये ‘मारो चरित्र’ हा चित्रपट आंध्रप्रदेशमधील १८ थिएटर्समध्ये जवळपास २०० दिवस सुरु होता, तर बॅंगलोरमध्ये ६९३ दिवस, चेन्नईत ५९६ आणि मैसुरमध्ये ३५० दिवस या चित्रपटाचे शो चालले होते… कमल हासन यांच्याबद्दल जितक्या गोष्टी सांगू तितक्या कमी आहेत पण जाता जाता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कमल हासन यांचं खरं नाव पार्थसारथी श्रीनिवासन असं होतं… पण त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव कमल हासन असं बदललं आणि त्यानंतर केवळ तमिळ फिल्म इंडस्ट्रीच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी राज्य केलं…ज्यांच्या चित्रपटांमधून हॉलीवूड स्टार्ससुद्धा प्रेरणा घेतात अशा विश्व नायक कमल हासन यांना ‘कलाकृती मीडिया’तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi