Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘देसी गर्ल’ Priyanka Chopra बॉलिवूड नाही तर साऊथमधून करणार कमबॅक!
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा २०१९ मध्ये ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात झळकली होती… त्यानंतर तिने आपली गाडी थेट हॉलिवूडकडे वळवली… अमेरिकत स्थायिक झालेल्या प्रियांकाने (Priyanka Chopra) बऱ्याच बॉलिवूड सीरीज आणि चित्रपटांमध्ये कामं केली… आता जवळपास ६ वर्षांनी पुन्हा एकदा ती भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करतेय… परंतु, बॉलिवूड नाही तप साऊथमधून कमबॅक करण्याचा तिने निर्णय घेतला आहे… (Bollywood Movies)

प्रियांका चोप्रा एस.एस. राजामौलींच्या SSMB29 या चित्रपटातून पुनरागमन करणार असून यात ती महेश बाबू सोबत स्क्रिन शेअर करणार आहे… मिळालेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये चित्रपटाचं टायटल आणि पहिली झलक लॉंच केली जाणार आहे… तसेच, नुकताच अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा ‘कुंभ’ या लूक समोर आला असून या चित्रपटातही प्रियांका असणार आहे.. परंतु, हा चित्रपट नवा साऊथ चित्रपट आहे की SSMB29 हेच या चित्रपटाचं नवा आहे हे लवकरच रिव्हील करण्यात येणार आहे… (Tollywood movies)

खरं तर, उत्कृष्ट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा नक्कीच मिळवून दिला… परदेशात असूनही ती भारतीय संस्कृती विसरली नाही आणि आपल्या मुलीला मालतीला देखील ती आपले संस्कार, परंपरा शिकवत असते हे तिच्या सोशल मिडियावरुन आपल्यासमोर येतंच… प्रियांकाचं साऊथ फिल्म्ससोबत घट्ट नातं आहे.. २००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर २००२ मध्ये प्रियांकाने तमिळ चित्रपट Thamizhan मधून अभिनयाची सुरुवात केली होती… आणि आता पुन्हा एकदा कमबॅकसाठी तिने बॉलिवूडनाही तर टॉलिवूडचीच निवड केली आहे.. कदाचित बॉलिवूडमधून काही मेकर्सनी तिला बॉयकॉट केल्यानंतर दुखावलेल्या प्रियांकाने विचारपुर्वक हा निर्ण घेत्याची देखील सिनेइंडस्ट्रीत चर्चा रंगली आहे… (Bollywood and Priyanka Chopra)
================================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
================================
दरम्यान, प्रियांका बॉलिवूडमध्येही ‘जी ले जरा’ आणि ‘शिला’ या चित्रपटात दिसणार आहे… तसेच, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात एका डान्ससाठी तिला अप्रोच केल्याचं देखील सांगितलं जात आहे…. या आधी भन्साळींच्याच रामलीला चित्रपटातील तिचं गाणं तुफान गाजलं होतं… आणि परत तिच कॅमेस्ट्री आगामी चित्रपटात दिसणार का हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत… (Sanjay Leela Bhansali)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi