Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Aaksh Narayankar-Anjali Shinde : मरणाच्या दारातून आलेल्या महाराष्ट्रातल्या रिलकपलची रिअल स्टोरी झळकणार मोठ्या पडद्यावर!
अलीलकडे केवळ शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही सोशल मिडियाचा वापर फार वाढला आहे… इतकंच नाही तर मुंबईपेक्षा खेड्यात रिल स्टार्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे… अशातच गेल्या काही काळात लोकप्रिय झालेल्या एका रिल स्टारची ह्रदयाला स्पर्श करणारी लव्हस्टोरी चक्क चित्रपटाच्या रुपात लवकरच आपल्या समोर येणार आहे… या रिलस्चार कपलचं नाव आहे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे… (Reel Star Couple from Maharashtra)
तर, सोलापूरचा आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांची प्रेमकहाणी आजच्या यंग जनरेशनला प्रेरणा देणारी आहे… घटस्फोट, ब्रेकअपच्या काळात त्यांची ही लव्हस्टोरी खऱ्या प्रेमाची परिभा, लोकांपर्यंत पोहोचवणारी आहे असं सांगितलं जात आहे… विशेष म्हणजे साऊथमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीवर चित्रपट येणार असून साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक कुमार यांनी हा चित्रपट करणार अशी घोषणा केली आहे.. ‘लव्ह यू मुड्डू’ असं या चित्रपटाचं नाव असून या दोघांनी खऱ्या आयुष्यात प्रत्येक संकटाचा सामना कसा केला हे यातून उलगडणार आहे… आपल्या पार्टनरला मृत्यूच्या दारातून खेचून आणण्याची ताकद दाखवणाऱ्या आकाश नारायणकरची कथा पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत… (South Love stories)

दरम्यान, अंजली आणि आकाश हे इतर सोशल मिडियावरच्या कपल्ससारखं एक जोडपं.. त्यांच्या व्हिडिओंना प्रसिद्धी मिळाली आणि रिल स्टार म्हणून त्यांची ओळख जगासमोर झाली… सगळं काही सुरळीत सुरु असताना अंजलीला ब्रेनट्युमर असस्याचं निदान झालं… आकाशच्या पायाखालची जमीन सरकली… पण खच्चून न जाता तो तिच्यासोबत खंबरपणे उभा राहिला… ट्युमरमुळे अंजलीची सर्जरी झाली,तिचे केस कापावे लागले, चेहऱ्यावरचं तेज आणि हास्य गेलं…पण अंजलीच्या कठीण काळात आकाश तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला. ती बरी व्हावी यासाठी शक्य ते सगळं केलं. देवाला साकडं घातलं, औषध-उपचार..कशातही तो मागे हटला नाही. त्याच्या या प्रयत्नांमुळेच अंजली इतक्या मोठ्या आजारातून बाहेर आली. लवकरच त्याची ही कहाणी चित्रपटरुपात येणार असून लोकं ही प्रेमकथा पाहायला आतुर झाले आहेत….(Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi