Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास केला!

 जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास केला!
कलाकृती विशेष

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास केला!

by धनंजय कुलकर्णी 11/11/2025

१९७० साली ऋषिकेश मुखर्जी यांचा एक चित्रपट आला होता ‘गुड्डी’ नावाचा. यातील शाळकरी नायिका जया भादुरी (Jaya Bhaduri) हि सिनेमाची प्रचंड शौकीन असते. ती कायम स्वत:ला त्या विश्वात हरवून बसलेली असते. यात तिच्या स्वप्नातील नायक असतो अभिनेता धर्मेंद्र. यात धर्मेंद्र यांनी चित्रपटात देखील धर्मेंद्रचीच भूमिका केली होती. पुढे तेच तिच्या डोक्यातून सिनेमाचे खूळ बाहेर काढतात असे या सिनेमाचे कथानक होते. पण असेच सिनेमाचे खूळ धर्मेंद्रंच्या स्वत:च्या डोक्यात ही होते. लहानपणापासून सिनेमाचे त्यांना प्रचंड आकर्षण होते. त्यांच्या गावा जवळून जाणाऱ्या फ्रटीयर मेल पाहून धर्मेंद्र रोज म्हणायचे, “अरे यार, तू कब मुझे मेरे सपनो के शहर ले जायेगी? ” (पुढे धर्मेंद्रने याच मेल मधून पळून जाऊन माया नगरी गाठली !) याच काळातील हा किस्सा आहे. (Dharmendra News)

त्या वेळी धर्मेंद्र सिनेमात आले नव्हते आणि पंजाबात कॉलेजचं शिक्षण घेत होते. या काळात त्यांना सिनेमाचा प्रचंड शौक होता. मनोमन त्यांनी सिनेमात जाण्याचं ठरवलं होतं पण घरच्यांचा विरोध होता. मुंबईला जाऊन सिनेमात काम करण्याला विरोध तर होताच शिवाय सिनेमा पाहायला देखील त्यांच्या घरून विरोध असायचा. त्यामुळे धर्मेंद्रने एक आयडिया केली होती. सिनेमा पाहायचा असेल तर गावात थेटर नव्हतं. त्यांना फगवाड्या वरून जालंदरला जावं लागायचं. जालंदरला ज्योती टॉकीजमध्ये नवीन हिंदी सिनेमा लागायचा. त्यावेळी तिथे प्रदर्शित होणारा प्रत्येक सिनेमा धर्मेंद्र पाहत होते. हे सर्व ते कॉलेजच्या वेळात उरकून टाकायचे. आणि साळसूदपणे घरी जायचे. कुणाला काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. (Entertainment Trending News)

घरच्यांना काही कळू नये त्यासाठी त्यांनी एक आयडिया केली होती. फगवाडाहून जालंदरला ते बसने जात असायचे आणि येताना पुन्हा बसने घरी परत यायचे. परंतु, संध्याकाळी घरी जाणारी बस सिनेमा संपायच्या आधीच निघत असायची आणि ती शेवटची बस असल्यामुळे ती पकडणं भाग असायचं. त्यामुळे धर्मेंद्र यांना बरेचसे सिनेमे हे शेवटी अर्धा तास बाकी असताना सोडावे लागत होते. शेवटचा क्लायमॅक्स सोडून थिएटरच्या बाहेर पडायला त्यंना खूप जड जात असे. चिडचिड व्हायची पण पर्याय नव्हता. शेवटची बस त्यांना पकडणं गरजेचं असायचं; नाहीतरी घरी बिंग फुटले जाण्याची शक्यता होती. घरच्यांना वाटायचं पोरगं कॉलेजला जात आहे, पण चिरंजीवांचे हे उद्योग चालू होते. हा सिलसिला बरेच दिवस बिन बोभाट चालू होता.

================================

हे देखील वाचा : धर्मेंद्र आणि राखी यांचा ‘Jeevan Mrityu’

================================

एकदा असेच चित्रपट पाहून शेवटचा अर्धा तास सोडून ते धावत धावत जालंधरच्या एसटी स्टँडवर गेले. तिथे बस अगदी निघण्याच्या तयारीत होती. त्यांनी हात करून कंडक्टरला थांबण्याचा इशारा केला. पण कंडक्टर काही थांबायला तयार नव्हता. आता पंचाईत झाली होती. ही बस पकडणे भाग होते. त्यामुळे बस सुटल्यानंतर धर्मेंद्र त्या बसच्या पाठीमागे सुसाट पळत गेले आणि शेवटी कसेबसे त्यांनी बसच्या मागे असलेल्या शिडीवर चढण्यात यश मिळवले. ही शिडी चढून ते वरती टपावर गेले. थंडीचे दिवस असल्यामुळे ते अक्षरशः गारठून गेले होते. पण काय करणार सिनेमाची हौस दांडगी होती. ज्या वेळेला फगवाडा आले त्यावेळी सर्व प्रवासी उतरत असताना हळूहळू ते देखील बसच्या शिडीवरून खाली उतरू लागले. कंडक्टरने ते बघितले. आणि कंडक्टरने त्याला पकडले! आणि त्याला पैसे मागितले. गरम धरम आता चिडला होता. म्हणाला,” मी तुला वारंवार विनंती करून बस थांबव म्हणत होतो तेव्हा थांबवली नाहीस आता कसले पैसे मागतोस ? तुला पैसे पण देणार नाही!”, असे म्हणून धर्मेंद्र तिथून पळून गेले. पण गाव छोटे होते. कंडक्टरने धरम यांच्या या लीला तिखट मीठ लावून त्यांच्या घरी सांगितल्या आणि धरम यांचं कॉलेज सुटलं ते सुटलंच!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bobby Deol Dharmendra dharmendra death rumors dharmendra movies Entertainment News esha deol guddi movie Hema Malini jaya bachchan sunny deol
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.