DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka Chopraच्या लूकवर चाहते फिदा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अखेर ६ वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे… विशेष म्हणजे बॉलिवूड नाही तर साऊथ चित्रपटसृष्टीची तिने निवड केली असून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या चित्रपटात ती झळकणार आहे… बऱ्याच दिवसांपासून या बहुचर्चित चित्रपटाचा #GlobeTortter हा हॅशटॅग व्हायरल होत असून या यातील पृथ्वीराज सुकुमारननंतर प्रियांका चोप्रा हिचा लूक समोर आला आहे… या चित्रपटात ती मंदाकिनी ही भूमिका साकरणार असून अद्याप चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे…(Bollywood News)

प्रियांका चोप्रा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील मंदाकिनी हा तिचा लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे…. पिवळी साडी, हातात बंदुक आणि पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल लक्ष वेधून घेणार आहे… आणि हातात बंदुक दिसल असल्यामुळे नक्कीच राजामौलींच्या या चित्रपटात भन्नाट Action सीन्स दिसणार असून यात प्रियांकाही चित्रपटात अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसणार असल्याचं स्पष्ट होत आहे… (SS Rajamouli)

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर या चित्रपटातील प्रियांका चोप्राचा पहिला लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय फिल्म इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर नेणारी महिला. देसी गर्ल प्रियांका चोप्रा, पुन्हा तुझे स्वागत आहे. ‘मंदाकिनी’ म्हणून जगाला तुझे वेगवेगळे रंग दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे.” तर, प्रियांकाने #GlobeTrotter असं लिहित तिने म्हटलं आहे की, “आशा करते की हा एक नवीन एरा असेल. मी भारतीय सिनेमात पुनरागम करत आहे. मला खात्री नाहीये, पण मला माहीत आहे की हे सगळं खूप अप्रतिम असणार आहे.”(South Movie)
================================
हे देखील वाचा : ‘देसी गर्ल’ Priyanka Chopra बॉलिवूड नाही तर साऊथमधून करणार कमबॅक!
================================
दरम्यान, राजामौली SSMB29 हा चित्रपट करणार असून यात महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत… आता या निनावी चित्रपटासाठी वापरल्या जाणाऱ्या #GlobeTortter चित्रपटाचं नाव नेमकं SSMB29 हेच आहे की अजून काही हे सगळं १५ नोव्हेंबर २०२५ रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या एका मोठ्या सोहळ्यात समजणार आहे… तमिळ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या प्रियांका हिने हॉलिवूडची वाट धरल्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याचा तिने साऊथमधून घेतलेला निर्णय मध्यंतरी बॉलिवूडने तिला दिलेल्या वागणूकीवर चपराक आहे असं नक्कीच म्हणावं लागेल….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi