Lapandav मालिकेतल्या सखी-कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलतं का?

Mother India तील भूमिका दिलीपकुमार यांनी का नाकारली?
दिग्दर्शक मेहबूब खान यांनी १९४० साली नॅशनल पिक्चर्सने बनवलेल्या ‘औरत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात त्यांची पत्नी सरकार अख्तरने नायिकेची भूमिका केली होती. चित्रपट नायिका प्रधान होता आणि या सिनेमाला चांगले यश मिळाले होते. पंधरा वर्षानंतर मेहबूब यांनी याच चित्रपटाचा रिमेक मोठ्या भव्य स्वरूपात करायचे ठरवले. मेहबूब यांच्या मित्रांनी ‘औरत’ या सिनेमाचा रिमेक बनवू नये कारण ‘औरत’ या सिनेमाची जादू अद्याप प्रेक्षकांवर कायम आहे असे सांगितले. पण मेहबूब यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवायचे ठरवले. त्यांनी चित्रपटाच्या कथानकात काही बदल केले. मूळ थीम मात्र कायम ठेवली. नायिकेच्या भूमिके साठी नर्गिस यांचे नाव फायनल झाले केले.

मूळ ‘औरत’ या चित्रपटात बिरजूची भूमिका याकूब या कलाकाराने केली होती. मेहबूब यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटात बिरजूची भूमिका त्यांनी दिलीप कुमार यांना द्यायचे ठरवले. जेव्हा दिलीप कुमार यांना याबाबत विचारले त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला होकार दिला पण नंतर त्यांच्या लक्षात आले की बिरजूची भूमिकेला निगेटिव्ह शेड आहे. काहीशी खलनायकी स्वरूपाची ही भूमिका त्यांना वाटली. त्यांनी मेहबूब खान यांना विचारले ,”ही भूमिका निगेटिव्ह शेडची आहे. माझ्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो!” त्यावर मेहबूब यांचे उतर होते,” तू या भूमिकेचा बारकाईने अभ्यास कर. तुला कुठेही निगेटिव्ह शेड इथे वाटणार नाही उलट जस्टीफाइड वाटेल!” पण नंतर दिलीप कुमारने दुसरा मुद्दा काढला की,” हा चित्रपट टोटली नायिका प्रधान आहे. इथे हिरोला वाव कुठे आहे?” आता मात्र मेहबूब खान काहीस नाराज झाले आणि ते म्हणाले,” तुझ्यासाठी मी चित्रपटाची कथानक बदलू शकत नाही. तुला जर भूमिका करायचे नसेल तर स्पष्ट सांग. परत कधी मला एखादी चांगली भूमिका तुला मिळाली तर मी नक्की तुला बोलावेल!”

अशा पद्धतीने दिलीप कुमार या चित्रपटातून वॉक आउट करून गेला. परंतु मेहबूब यांच्या मनातून तो कायमचा उतरला आणि पुन्हा त्यांनी कधीच त्यांचा विचार केला नाही. दिलीप कुमार यांनी नकार दिल्यानंतर मेहबूब खान यांनी अमेरिकेत असलेल्या भारतीय वंशाच्या साबू दस्तगीर (हॉलीवूड च्या ‘एलीफंट बॉय’ चा हिरो) या कलाकाराशी संपर्क साधला आणि त्याला भारतात बोलावून घेतले. साबू त्या काळात हॉलीवुड मधील लोकप्रिय अभिनेता होता. मदर इंडिया या चित्रपटातील बिरजूची भूमिका साबूला देण्याचे मेहबूब यांनी निश्चित केले. परंतु आर्टिस्ट असोसिएशन ने त्याला विरोध केला आणि परदेशी कलाकारांना भारतीय चित्रपटात भूमिका कशा काय देता? असा आक्षेप घेतला. अशा पद्धतीने साबू यांना पुन्हा अमेरिकेत परत जावे लागले.
मेहबूब खान यांचे मित्र त्यांना म्हणू लागले की तुम्हाला आर्टिस्ट मिळत नाहीत या चित्रपटाची आयडिया तुम्ही ड्रॉप का करत नाही? त्यावर मेहबूब भडकले आणि म्हणाले,” मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मी हा विषय बदलणार नाही. माझ्या आवडीचे कलाकार मिळत नसल्यामुळे काय झालं? विषय तर माझ्या आवडीचा आहे!” त्यांनी ताबडतोब त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर चिमणभाई गांधी यांना बोलावून घेतले आणि ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ सिनेमात काम केलेल्या एका कलाकाराला बोलवण्यास सांगितले. हा कलाकार होता सुनील दत्त. दुसऱ्या दिवशी सुनील दत्तची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि बिरजू भूमिका त्याला देण्यात आली.
================================
हे देखील वाचा : Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ या क्लासिक चित्रपटाचे जनक !
================================
राजेंद्र कमारने मेहबूब प्रोडक्शनचा ‘आवाज’ या चित्रपटात छोटा रोल केला होता. त्याला बिरजूच्या मोठ्या भावाच्या रामू भूमिकेत घेण्यात आले. राजकुमार तेव्हा स्ट्रगलर होता त्याला नर्गिसच्या पतीच्या भूमिकेत घेण्यात आला. चित्रपटातील नायिका कुमकुम आणि चंचला यांना फारसा स्कोर नव्हताच. कन्हैया लाल मात्र मूळ औरत या चित्रपटात सुखीलाच्या भूमिकेत होता इथे देखील त्याला तीच भूमिका करायची होती.मूळ ‘औरत’ मधील खलनायक अभिनेता कन्हैय्यालाल, छायाचित्रकार फरदून इराणी आणि संवाद लेखक वजाहत मिर्झा हे तिघे ‘मदर इंडिया’त कायम होते.