
बॉलिवूडमधील सर्वात वयस्कर आणि ज्येष्ठ अभिनेत्री Kamini Kaushal यांचं निधन
हिंदी चित्रपटसृष्टीत ७ दशकांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज १४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं… वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला… १९४६ पासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामिनी कौशल यांना सर्वात वर्यस्कर अभिनेत्री असं म्हटलं जातं… विशेष म्हणजे त्या ४०-५०च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या… कामिनी यांच्या निधनामुळे फिल्मी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे… (Kamini Kaushal Death)
कामिनी कौशल यांनी १९४६ ते १९६३ या काळात मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये कामं केली… आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अविट छाप सोडली आहे… १९४६ पासून ते २०२२ पर्यंत तब्बल ७६ वर्ष चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या कामिनी या एकमेवाद्वितीयच…! त्यांचा डेब्यू चित्रपट होता ‘नीचा नगर’ (१९४६)… जो आजही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पाल्म डोर’ पुरस्कार जिंकणारा भारताचा एकमेव चित्रपट आहे.

कामिनी कौशल यांनी आजवर ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदियाँ के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’, ‘नमूना’, ‘जेलर’, ‘नाईट क्लब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत… तसेच, ‘नीचा नगर’ या चित्रपटाने पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. शिवाय, त्यांचा ‘पाम डी’ओर’ जिंकणारा हा एकमेव भारतीय चित्रपट होता. यामुळे एक प्रतिभावान नवोदित कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. कामिनी कौशल यांचा २०२२ मध्ये आलेला लाल सिंह चड्ढा हा शेवटचा चित्रपट ठरला होता…

लाहौरमध्ये १९२७ मध्ये जन्मलेल्या कामिनी कौशल यांचं खरं नाव उमा कश्यप असं होतं. त्यांचे वडील शिवराम कश्यप हे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ होते… कामिनी यांनी लहानपणी घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे, हस्तकला यांसारख्या कलांचं शिक्षण घेतलं होतं… इतकंच नाही तर, कामिनी यांनी रेडिओ नाटकं आणि नाट्यगृहांमध्येही भाग घेतला होता.
================================
================================
कामिनी कौशल यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद आणि अशोक कुमार यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. ‘नदियाँ के पार’, ‘शहीद’, ‘शबनम’ आणि ‘आरझू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची दिलीप कुमार यांच्यासोबतची ऑनस्क्रीन केमिस्ट्री विशेष गाजली होती… ७ दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कामिनी कौशल यांना ‘कलाकृती मीडिया’तर्फे भावपूर्ण आदरांजली.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi