“आता ‘धर्मवीर 3’ नाही, तर ‘गुवाहाटी फाइल्स’ घेऊन येणार”, Mangesh

“आता ‘धर्मवीर 3’ नाही, तर ‘गुवाहाटी फाइल्स’ घेऊन येणार”, Mangesh Desai यांचं विधान चर्चेत
धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer Movie) या चित्रपटाने इतिहास रचला… २०२२ मध्ये ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट रिलीज झाला होता… त्यानंतर २०२४ मध्ये ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आला… आता निर्माते मंगेश देसाई धर्मवीर ३ कधी आणणार याची चर्चा सुरु असताना देसाईंचं एक महत्वाचं विधान चर्चेत आलं आहे… येत्या काळात ‘धर्मवीर ३’ नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर चित्रपट ते घेऊन येणार आहेत…. (DCM Eknath Shinde)

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “आता धर्मवीर ३ नाही, जर मी केला तर ‘गुवाहाटी फाईल्स’ करेन आणि तोसुद्धा २०२७-२८ला करेन. त्याचं अजून नक्की काहीच नाही”… त्यामुळे आता मंगेश देसाईंच्या या विधानामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे…. (Marathi Movie)
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडमधील सर्वात वयस्कर आणि ज्येष्ठ अभिनेत्री Kamini Kaushal यांचं निधन
================================
दरम्यान, मंगेश देसाई यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘साक्षात्कार’, ‘नाती-गोती’, ‘बाबा लगीन’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘धुडगूस’, ‘हुप्पा हुय्या’, ‘कोण आहे रे तिकडे’, ‘बायोस्कॉप’, ‘एक अलबेला’, ‘जजमेंट’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत… शिवाय क्राइम पेट्रोल या मालिकेत त्यांनी पोलिसाची भूमिका देखील केली आहे… (Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi