
‘Lakshmichya Pavalani’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, या प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री!
Star Pravah वरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ने गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयावर आपली छाप सोडली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं आहे, आणि आता लवकरच या मालिकेत एक नवीन वळण येणार आहे. एक नवा आणि महत्त्वाचा पात्र, सुकन्या पाटील, मालिकेत दाखल होणार आहे. सुकन्या पाटील ही एक नर्स असून तिच्या शांत जीवनात अनेक गुपितं दडलेली आहेत. रुग्णांची सेवा करणे ही तिची आवड असून तिला लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणायला खूप समाधान मिळते.(Lakshmichya Pavalani Serial)

प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार आहेत, आणि चार वर्षांनी ती टीव्ही विश्वात दमदार पुनरागमन करत आहे. या भूमिकेबद्दल नक्षत्रा म्हणाली की, “माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही माझ्या हृदयात खास स्थान राखतो. प्रेक्षकांच्या दरवाजावर पुन्हा येण्याचा संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदित आहे. सुकन्या पाटील हे पात्र मला ऐकताक्षणीच आकर्षक वाटलं. सुकन्या आणि माझा स्वभाव बराच मिळताजुळता आहे. सुकन्या अतिशय सकारात्मक आहे आणि देवावर तिला प्रचंड विश्वास आहे. तशीच माझ्या जीवनातही जे काही घडतं ते मी देवावर सोडते.”

सुकन्या पाटीलच्या पात्राविषयी नक्षत्रा अधिक सांगताना म्हणाली की, “सुकन्या ही छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणारी आणि सदैव हसतमुख असणारी आहे, पण तिच्या मनात प्रचंड वेदना दडल्या आहेत. ती तिच्या आयुष्याला एक भेट मानते, हक्क नाही. सुकन्या तिच्या भूतकाळावर कधीच प्रकाश टाकत नाही, ती फक्त ‘मी कोण आहे?’ यापेक्षा ‘मी काय करते?’ हे अधिक महत्त्वाचे मानते. त्यामुळे तिच्या भूतकाळात काय आहे आणि तिच्या येणाऱ्या जीवनात काय घडणार आहे, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.”(Lakshmichya Pavalani Serial)
=============================
हे देखील वाचा: Lapandav मालिकेतल्या सखी-कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलतं का?
=============================
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेची कथा आता एक नवा वळण घेणार आहे, आणि सुकन्या पाटीलच्या पात्राने कथा आणखी रोमांचक होईल. ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत आहे, ज्यात इशा केसकर, अक्षर कोठारी, किशोरी आंबीये, दिपाली पानसरे, अपूर्वा सपकाळ, रोहिणी नाईक, ध्रुव दातार आणि ऋत्विक तळवलकर यांची प्रमुख भूमिका आहे. नवीन पात्र, नवे ट्विस्ट आणि एक रोमांचक कथा प्रेक्षकांच्या समोर येत आहे, आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ च्या यापुढील अध्यायांसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.