
Vivek Oberoi : फराह खानचा असिस्टंट ते १२०० कोटींचा मालक!
काही चित्रपटांचे कितीही सीक्वेल्स आले तरी ते पाहायला कंटाळा येत नाही आणि काही सीक्वेल्स का केले असा प्रस्न नक्कीच प्रेक्षकांना पडतो… असाच एक प्रेक्षकांना हवा असणारा सीक्वेल लवकरच भेटीला येणार आहे… आणि तो म्हणजे ‘मस्ती ४’ (Masti 4)… रितेश देशमुख, विवेक ऑबरॉय (Vivek Oberoi) आणि आफ्ताब शिवदसानी यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मस्ती’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड वालं होतं… आता या चित्रपटाचा चौथा भाग अर्थात ‘मस्ती ४’ येत्या २१ नोल्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे.. २००४ मध्ये रिलीज झालेल्या या ‘मस्ती’ चित्रपटात ३ मित्रांची भन्नाट गोष्ट दाखवली होती… आज आपण या ३ मित्रांमधील एका अभिनेत्याची रिअल लाईफ गोष्ट जाणून घेणार आहोत… डान्स कॉरिऑग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) यांचा असिस्टंट ते हजारो कोटींची मालमत्ता उभी करणाऱ्या विवेक ऑबरॉयची फिल्मी स्टोरी जाणून घेऊयात…

विवेक ऑबरॉय या ज्येष्ठ अभिनेते सुरेश ऑबरॉय यांचा मुलगा… वडलांकडूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या विवेकचा इंडस्ट्रीतला प्रवास तसं पाहायला गेलं तर सोप्पा नव्हता… एकेकाळी कलाकारांच्या रिअर्सलच्या खोल्या देखील विवेकने साफ केल्या आहेत… विवेकने नुकतीच मॅशाबल इंडियाला मुलाखत दिली होती, यात त्याने स्ट्रगलींच्या दिवसांची आठवण शेअर केली होती… विवेक की, “मी फराह खानचा असिस्टंट म्हणून बरीच वर्षे कामे करत होतो. जिथे कलाकार, डान्सर रिहर्सल करायचे त्या खोल्या साफ करणे, सर्वांना चहा नेऊन देणे अशी मी सुरुवात केली होती. मी कधीच कोणाला हे सांगितले नाही की माझे वडील कोण आहेत”… (Bollywood News)
हळूहळू इंडस्ट्रीत आपला जम बसवत विवेकने २००२ मध्ये ‘कंपनी’ या चित्रपटातून अभिनयाचा प्रवास सुरु केला… पुढे ‘रोड’, ‘साथिया’, ‘दम’, ‘युवा’, ‘काल’, ‘ओमकारा’, ‘नक्शा’, ‘शुटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘फुल अॅण्ड फायनल’, ‘मिशन इस्तानबुल’, ‘रक्त चरित्र’, ‘क्रिश ३’ अशा बऱ्याच चित्रपटात त्याने विविधांगी भूमिरका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… (Vivek Oberoi Movies)

विवेक त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत होताच; पण ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) सोबतच्या रिलेशनमुळे तो अधिक लॅमलाईटमध्ये आला… सलमान खान (Salman Khan) सोबत ऐश्वर्याचं ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ऑबरॉय आणि ऐश्वर्या राय रिलेशनमध्ये होते.. त्यानंतर सलमान खानबरोबर झालेल्या वादामुळे त्याच्या करिअरवर परिणाम झाला…

२००३ मध्ये विवेकने सलमान खानकडून छळ होत असल्याचा आरोप करत एक पत्रकार परिषद बोलावली होती… यानंतर सिनेकरिअरवर याचा वाईट परिणाम झाला. प्रखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणालेला की, “मला इंडस्ट्रीतून काढून टाकण्यात आले होते. त्या काळात एक क्षण असा आला की आजूबाजूचे सर्वजण माझ्यावर बहिष्कार घालत होते. कोणीही माझ्याबरोबर काम करण्यास तयार नव्हते आणि मी आधीच साइन केलेल्या चित्रपटांमधूनही मला काढून टाकण्यात आले. इतकेच नाही तर मला धमक्या देणारे बरेच फोन येत होते. हे फोन माझ्या बहिणीला, वडिलांना आणि आईलाही येत होते”… परंतु, सगळ्या कठिण परिस्थीतीवर मात करत विवेक ऑबरॉयने स्वत:ला सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा त्याने दमदार कमबॅक केलं… (Entertainment News)
================================
================================
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार विवेक कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे... केवळ अभिनय हाच त्याचा व्यवसाय नसून रिअल इस्टेट कंपनी कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मेगा एंटरटेनमेंट या कंपन्यांचा तो मालक असून यातून तो प्रामुख्याने कमावतो… तसेच, विवेक स्वर्णिम युनिव्हर्सिटीचा सह-संस्थापक आणि अनेक स्टार्ट-अॅप्समध्ये गुंतवणूकदार देखील आहे… शिवाय, फोर्ब्सच्या ४० अंडर ४० हिरोज ऑफ फिलान्थ्रॉपी यादीत स्थान मिळवणारा विवेक ऑबरॉय हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. द स्टेटमन आणि इतर रिपोर्ट्सनुसार विवेकची संपत्ती जवळपास १२०० कोटी इतकी असून तो भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. विशेष म्हणदे असं देखील सांगितलं जातं की, विवेकची संपत्ती रणबीर कपूर, अल्लू अर्जुन, प्रभास आणि रजनीकांतसारख्या सुपरस्टारपेक्षाही जास्त आहे. (Vivek Oberoi News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi