‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

SS Rajamouli यांना हनुमानाबद्दलचं ‘ते’ विधान भोवलं; हिंदु धर्माचा अपमान केल्याबद्दल तक्रार झाली दाखल
राष्ट्रीय पुरस्कार विजेते एस.एस राजामौली लवकरच त्यांचा ‘वाराणसी’ (Varanasi Movie) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत… भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा हा चित्रपट असून १००० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा टायटल रिव्हील प्रोग्राम नुकताच हैदराबादमध्ये संपन्न झाला… या कार्यक्रमात राजामौलींनी देवांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे… इतकंच नाही तर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे… नेमकं काय म्हणाले होते राजामौली जाणून घेऊयात…
हैदराबादमध्ये झालेल्या कार्यक्रमात राजामौली म्हणाले होते की, “हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी स्वतः देवाला मानत नाही,माझा देवावर विश्वास नाही. मी नास्तिक आहे. पण माझे वडील नेहमी म्हणतात की, हनुमानजी सर्व काही सांभाळून घेतील. पण, ते अशा प्रकारे सांभाळून घेतात का? हा विचार करून मला खूप राग येत आहे. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाचा आशीर्वाद घेण्याबद्दल आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्याबद्दल सांगितले, तेव्हा मला खूप राग आला.” (Ss Rajamouli)

राजामौली यांनी भर कार्यक्रमात भगवान हनुमानाबाबत केलेल्या टिप्पणीमुळे ते अनेकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या त्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला आहे… हनुमानाबद्दल केलेलं विधान त्यांना भोवलं असून बजरंगबली आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेचा अपमान त्यांनी केला आहे असं म्हटलं गेलं आहे… वानर सेना संघटनेने सरूरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे… (Entertainment News)
================================
================================
दरम्यान, राजामौलींच्या ‘वाराणसी’ चित्रपटात महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत… विशेष म्हणजे महेश बाबूचा हा मुख्य अभिनेता म्हणून २९वा चित्रपट असल्याचं देखील सांगितलं जात आहे… तर, प्रियांका चोप्रा हिने जवळपास ६ वर्षांनी भारतीय चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं असून तिने बॉलिवूड नाही तर साऊथ चित्रपटाची निवड केली आहे… (SS Rajamouli News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi