‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका Sara Arjun आहे तरी कोण?
सध्या सगळीकडे रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा रांगडा लूक असणाऱ्या ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटची जोरजार चर्चा सुरु आहे… मल्टीस्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटात सगळ्या हिरोंच्यामध्ये एक २० वर्षांची अभिनेत्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे… रणवीर सिंग आणि धुरंधरची नायिरा सारा अर्जून (Sara Arjun) यांच्या वयात २० वर्षांचं अंतर असून जवळपास १३०० मुलींना मागे टाकत या चित्रपटात रणवीरसोबत स्क्रिन शेअर करण्याची तिला संधी मिळाली आहे… खरं तर कुठलाही नवा चित्रपट आला की त्यातील नवोदित अभिनेत्रींची चर्चा होतेच.. जसं की ‘कांतारा – १’ मधील रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth) हिची झाली होती आणि आता सारा अर्जून कोण यासाठी हिंदी भाषिक तिचे तिची ओळख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत… चला तर मग जाणून घेऊयात सारा अर्जून नेमकी आहे तरी कोण? (Who is Sara Arjun?)

१८ जून २००५ मध्ये मुंबईत जन्माला आलेल्या सारा अर्जूनच हिचे वडिल साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते राज अर्जून (Raj Arjun) हे आहेत… लहानपणापासूनच अभिनयाची गोडी असणाऱ्या सारा हिला चक्क मॉलमद्ये फिरताना पहिली जाहिरात मिळाली होती…त्यानंतर चित्रपटात तिला २०११ मध्ये प्रमुख अभिनेत्रीची संधी मिळाली होती… सारा अर्जून हिने मणी रत्णम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटात साराने ऐश्वक्या राय (Aishwerya Rai) हिच्या बालपणीची भूमिका साकारली होती… असं सांगितलं जातं की या चित्रपटाच्या यशानंतर यशानंतर सारा अर्जुनची कमाई जवळपास ₹10 कोटीवर पोहोचली. तिला कधीकाळी भारतातील सर्वात श्रीमंत बालकलाकार म्हणूनही ओळख मिळाली होती.. (South Indian Films)

साराने २०११ मधील हिंदी चित्रपट ‘404’ आणि ‘तमिळ देइवा थिरुमगल’ मधून अभिनयाची सुरुवात केली होती… त्यानंतर ‘एक थी डायन’, ‘जय हो’, ‘जज़्बा’, ‘द साँग ऑफ स्कॉर्पियन्स’, ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’, ‘अजीब दास्तान्स’ अशा अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार आणि तरुण अभिनेत्री म्हणून तिने काम केलं आहे. केवळ अभिनयच नाही तर सारा कत्थक, हिप-हॉप, तसेच जिम्नॅस्टिक, कराटे आणि एमएमएसारख्या कौशल्यांमध्येही निपुण आहे. (Sara Arjun Movies)
================================
================================
दरम्यान, धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर (Aaditya Dhar) यांनी ट्रेलर लॉंच इव्हेंटमध्ये या चित्रपटासाठी सारा अर्जूनची निवड कशी झाली याचा किस्सा सांगितला होता… आदित्य यांना चित्रपटातील या भूमिकेसाठी एक नवा चेहरा हवा होता… सारा अर्जुनच्या भूमिकेसाठी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या टीमने सुमारे १३०० मुलींचे ऑडिशन घेतले होते… आणि यानंतर, अखेर सारा अर्जूनला रणवीर सिंगच्या अपोझिट फिमेल लीड म्हणून कास्ट करण्यात आलं आणि साराने देखील आपल्या कामातून तीच या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे हे सिद्ध केलं… (Bollywood News)
‘धुरंधर’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून नेमकी ती घटना कोणती आहे ते जाहिर अद्याप केलं नाही आहे… या चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत संजय दत्त, अर्जून रामपाल, आर.माधवन, अक्षय खन्ना आणि सारा अर्जून झळकणार आहेत… ५ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात हा चित्रपट रिलीज होणार आहे… (Dhurandhar Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi