Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

 Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….
कलाकृती विशेष

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

by रसिका शिंदे-पॉल 21/11/2025

पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं आपल्याला मोठी मंडळी सांगतात… कित्येकदा तर, तु परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला आहेस असं स्वप्न बघ म्हणजे खरं होईल असंही आपल्यापैकी काहींच्या पालकांनी आपल्याला सांगितलं असेल… पण जर का तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही पाहिलेलं स्वप्न हे तुमच्या मागच्या जन्माचं आहे तर? विश्वास बसेल का? कदाचित नाही किंवा हो देखील असं काहींच उत्तर असेल… आता हो का? तर बऱ्याचवेळा एखादा प्रसंग आता प्रेझेंटमध्ये जरी आपण अनुभवत असलो तरी हे मी कुठेतरी पाहिलं आहे किंवा असं काहीतरी घडलं आहे असं नकळत आपण कुणाकडून तरी ऐकतो किंवा स्वत: ते अनुभवतो… असंच काहीसं घडलंय ‘असंभव’ चित्रपटातील नायिका मानसीसोबत… आपल्या मागच्या जन्मातील खुनाचा आरोपी पुर्नजन्म घेऊन शोधणाऱ्या मानसीची मर्डर मिस्ट्री नेमकी आहे तरी काय? चला जाणून घेऊयात….

आधी ‘असंभव’ या मर्डर मिस्ट्री चित्रपटाची कथा काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात… चित्रपटाची कथा साधारणपणे ७०-८०चं दशक आणि आजच्या २१व्या अशा २ दशकांची आहे… तर, चित्रपटाची सुरुवात होते नायिका मानसी (अभिनेत्री मुक्ता बर्वे) झोपेत स्वत:चाच खुन होताना पाहात असते आणि स्वप्नातील तिच्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रीच्या पोटात खुपसलेल्या सुऱ्याची वेदना तिला इथे वर्तमानकाळात होताना असते… तडकाफडकी ती जागे होते आणि नेमकं ती का विव्हळत होती आणि स्वप्नात दिसणारी तिच्यासारखीच ती स्त्री आणि ती हवेली नेमकी कुणाची आहे आणि त्याचं मानसीशी काय कनेक्शन आहे याची स्टोरी बिल्डींग तयार होते… पेशाने आर्किटेक्ट असणारी मानसी आदित्य (अभिनेता सचित पाटील) याला भेटते आणि पुढे कामानिमित्त त्यांची झालेली ओळख प्रेमात रुपांतरीत होते… तिला पडणाऱ्या स्वप्नांमुळे पुढे आदित्यसोबतचं तिचं नातं कसं बदलतं? मागच्या जन्मात त्या दोघांचे काय संबंध असतात, साधना (अभिनेत्री प्रिया बापट) हिचं या दोघांशी काय कनेक्शन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसीला दिसणाऱ्या स्वप्नातील त्या स्त्रीचा खुनी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी मराठीतील ‘असंभव’ ही नवीकोरी मर्डर मिस्ट्री फिल्म नक्की पाहिलीच पाहिजे…

आता वळूयात जरा वळूयात दिग्दर्शन, लिखाण आणि कथेच्या मांडणीकडे… खरं तर मराठीत मर्डर मिस्ट्री लिहिणारे अनेक ताकदीचे लेखक होऊन गेले.. रत्नाकर मत्करी यांचा तर या बाबतीत कुणी हात पकडूच शकत नाही… पण असं असलं तरी आत्तापर्यंत ताकदीचं लिखाण असणारी मर्डर मिस्ट्री चित्रपटात सादर केली गेली नाही ही खंतच म्हणावी लागेल… हा आत्तापर्यंत ‘वाळवी’, ‘पुणे ५२’, ‘विक्टोरिया’ असे काही चित्रपट आले पण तरीही प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवण्याचं कसब जे साऊथ मर्डर किंवा थ्रिलर चित्रपटांमध्ये आहे ते मराठीत जरा कमी पडलंय… पण तरीही लेखक कपिल भोपटकर, विशाल इनामदार आणि स्वत: सचित पाटील यांनी ‘असंभव’ चित्रपटासाठी कथेची निवड आणि त्याची मांडणी उत्तमरित्या केली आहे… शिवाय, दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ या दोन्ही वेगवेगळ्या Genere च्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या सचितकडून ही अशी उत्तम मर्डर मिस्ट्री खरं अपेक्षित नव्हती.. चित्रपटाचा फर्स्ट हाफ फारच प्रेडिक्टेबल आणि जरा रटाळवाणा आहे… म्हणजे कॅरेक्टर आणि स्टोरी बिल्डींगच्या नादात खुनी कोण असेल? याचा काही ठिकाणी थेट अंदाज प्रेक्षक बांधू शकतील असं बऱ्याच जागी होतं… पण सेकंड हाफ जो टर्न घेतो तो प्रेक्षकांना विचार करायला आणि त्यांना खुर्चीला खिळून ठेवणारा नक्कीच आहे…

आता मर्डर मिस्ट्री खरं तर बॉलिवूडपेक्षा साऊथमध्ये फार जास्त तयार केल्या जातात… सुरुवातीला जरा संथ वाटणारी कथा हळूहळू स्पीड घेत एका वेगळ्याच एंडिगवर प्रेक्षकांना घेऊन जाते आणि ‘असंभव’च्या बाबतीत अगदी तसंच झालं आहे… मानसी आणि आदित्य यांची Present मधली लव्हस्टोरी टिकून राहण्यासाठी मागच्या जन्मात घडलेल्या काही घटनांचा सोक्षमोक्ष लावणं गरजेच असतं हे दाखवताना एक सरळ-सुंदर प्रेमकथा देखील प्रेक्षकांना पाहायला मिळते… शिवाय, सिंगल मदर असणाऱ्या एका स्त्रीकडे दुसरी स्त्री किंवा समाज एका वेगळ्या नजरेने कायम पाहतात; याबाबतीत सत्य परिस्थीत जाणून न घेण्याची त्यांची मानसिकताही कुठेतही मेकर्सने ‘असंभव’ चित्रपटातून मांडली आहे… मानसी,आदित्य, साधना, संजू आणि डॉ. सत्यजित यांचं कॅरेक्टर बिल्डींग तर मेकर्सना जमलं आहे खरं पण जरा खोलात जाऊन प्रत्येकाचा पास्ट जरा अजून सविस्तरपणे मांडला असता तर अधिक मजा नक्कीच आली असती… मी असं म्हणत नाहीये की मराठीने साऊथ मर्डर मिस्ट्री्जची कॉपी केली पाहिजे; पण तरी त्यांच्याकडून अशा पद्धतींच्या कथांची थोडी मांडणी कशी करावी हे आत्मसात केलं तर मराठीत मर्डर मिस्ट्री हा Genere प्रेक्षकांना अधिक आवडू लागेल यात शंका नाही… दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात ३ प्रमुख पात्र आणि ३ त्यांना सपोर्ट करणारी पात्र आहेत… त्यामुळे संशय एकावरुन दुसऱ्यावर शिफ्ट होत राहतो... अर्थात प्रेक्षकांचा गोंधळ निर्माण होतोच पण कथा अधिक रंजक आणि गुंतागुंतीची करण्यासाठी मेकर्सने काही अधिक पात्रांची जोड यात दिली असती तर ‘असंभव’ हा थोडा अधिक उजवा ठरला असता… परंतु, कथेची गरज लक्षात घेता साकलेला स्क्रिन प्ले हा पुरक ठरतो हे देखील तितकंच खरं…

आता वळूयात कलाकारांच्या अभिनयाकडे… मघाशी म्हटल्याप्रमाणे आणि चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच ‘असंभव’ या चित्रपटाची कथा खुन आणि पुर्नजन्म याच्याभोवती फिरते हे आपल्या लक्षात येतंच… पण असं असताना पुर्नजन्मातील मेन कॅरेक्टर्स आणि मागच्या जन्मातील काही कॅरेक्टर्स जे आजही जीवंत दाखवले आहेत त्यांच्या वयाबद्दल जरा प्रश्नचिन्ह निर्माण होतं… ही एक बाब सोडली असता मुक्ता बर्वे, सचित पाटील, संदीप कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी त्यांच्या भूमिकेला १०० टक्के न्याय दिला आहे…. जराशी वेंधळी पण तितकीच आपल्या निर्णयांवर ठाम असणारी मानसी, आपलं प्रेम किती Pure आहे हे प्रत्येक क्षणाला सिद्ध करणारा आदित्य आणि ७०-८०च्या दशकातील Single Mother असणारी साधना सेहगल या भूमिका मुक्ता, सचित आणि प्रिया नव्हे तर ती खरी पात्रच आहेत हे प्रेक्षकांना पटवून देण्यात तीनही कलाकार यशस्वी झाले आहेत… शिवाय, सायकॉलॉजिस्ट डॉ. सत्यजित यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी Apt साकारली आहे…. चित्रपटाचं संगीत आणि बॅग्राऊंड स्कोअर average आहे… चित्रपटात एकच गाणं असून ते देखील स्टोरी पुढे घेऊन जाण्यासाठी दाखवलं आहे….

================================

हे देखील वाचा : Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!

================================

एकंदरीत मराठीत आणखी एक बरी मर्डर मिस्ट्री असणारा चित्रपट म्हणून ‘असंभव’ची एन्ट्री झालीये असं म्हणावं लागेल… जी लोकं वेगवेगळ्या भाषेतील मर्डर मिस्ट्री चित्रपट पाहतात त्यांना कदाचित सेकंट हाफमध्ये खुनी कोण असेल याचा अंदाज येऊ शकतो… काही ठिकाणी पात्रांच्या संवादावरुन पुढची स्टोरीलाईन काय असेल हेही Assume आपण जरी केलं तरीही regular murder mystry पाहणाऱ्या लोकांना आणि थिएटरमधल्या प्रेक्षकांनाही क्लिन बोल्ड करत शेवट वेगळ्याच वळणावर आणण्यात दिग्दर्शक, लेखक खरे उतरले आहेत… ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटीलने केलं असून सह-दिग्दर्शन पुष्कर श्रोत्रीने केलंय… या चित्रपटात चार भूमिकांमध्ये दिसलेला सचित पाटील मराठीl ’असंभव’च्या निमित्ताने उत्कृष्ट आणि दर्जेदार मर्डर मिस्ट्री आणण्यात यशस्वी झाला आहे असं म्हणत त्याचं कौतुक नक्कीच करायला हवं… खऱ्या अर्थाने बऱ्याच काळानंतर मराठीत विषयांच्याबाबतीत वेगवेगळे प्रयोग सादर केले जात आहेत आणि प्रेक्षकांचाही त्याला उत्सफुर्त प्रतिसाद मिळतोय ही अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे…

कलाकृती मिडिया ‘असंभव’ चित्रपटाला देत आहे पाच पैकी साडेतीन स्टार्स!

-रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Asambhav Marathi Movie asambhav movie review bollywood marathi movie Entertainment News film review muktaa barve priya bapat sachit patil sandeep kulkarni
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.