
घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !
‘Bigg Boss 19 ’मधून लोकप्रिय झालेला शिव ठाकरे (Shiv Thakare) एका मोठ्या अनर्थातून थोडक्यात बचावला आहे. मंगळवारी सकाळी गोरेगाव पश्चिमेतील कोळते पाटील इमारतीच्या बंगूर नगर परिसरातील त्याच्या घरात अचानक भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग पसरत असताना घरात नेमकं काय घडलं, याचा अंगावर काटा आणणारा अनुभव शिवने स्वतः सांगितला.(Shiv Thakare)

शिव घराला आग लागल्याच्या वेळी घरातच होता, पण गाढ झोपेत असल्याने त्याला काहीच कळले नाही. त्याच्या मोलकरणीने दार ठोठावत दिलेला इशारा त्याच्या जीवदानासारखाच ठरला. शिव याबद्दल सांगताना म्हणतो की, “घरात आग लागलीय हे मला झोपेतून उठल्यावरच कळलं. अलार्म वाजला नाही, सायरन ही वाजला नाही… माझी मोलकरीण देवदूतासारखी धावून आली. बाहेर पडलो तर घर अक्षरशः राख झालेलं दिसलं.” हा प्रसंग सांगताना शिवचा आवाज थरथरत होता. “देवाची कृपा म्हणूनच मी आज जिवंत उभा आहे,” असे तो वारंवार म्हणाला.

घडलेल्या घटनेत घराची प्रचंड हानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार १२व्या मजल्यावर असलेल्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली. त्या इमारतीत काही दिवसांपासून विजेच्या तक्रारी होत्या, आणि घटना घडली तेव्हा स्प्रिंकलर्सही सुरू झाले नाहीत, अलार्म सिस्टीमनेही काम केले नाही. हे सर्व चिंताजनक असल्याचे समजते. ( Shiv Thakare)
==============================
==============================
“पैसा परत कमावू शकतो…पण माझ्या ट्रॉफीज, माझ्या आठवणी त्या कुठल्याही किमतीत परत मिळणार नाहीत.” ‘बिग बॉस’, रिअॅलिटी शो आणि स्पर्धांमधून मिळवलेल्या त्याच्या या स्मृती वस्तू जळून खाक झाल्याने शिव खूप भावूक झाला आहे. या भीषण दुर्घटनेत शिवचा जीव थोडक्यात वाचल्याची बातमी समोर येताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोशल मीडियावर शिवसाठी प्रार्थनांचा वर्षाव होत आहे.