बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात ‘Yed Lagal Premach’ मालिकेतून करण्यात येणार जनजागृती!

Dharmendra यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चाहते झाले भावुक
बॉलिवूडचे ही-मॅन पद्मभूषण धर्मेंद्र यांचं आज २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं… त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे… एकीकडे त्यांच्या निधनाची बातमी आली असून दुसरकीडे त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज झालं आहे… ‘इक्कीस’ (Ikkis) असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे…

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) यांनी शेवटचं काम केलं असून यात शहीद मुलाच्या वडिलांची भूमिका ते साकारताना दिसणार आहेत. ‘एका बापाने मुलाला वाढवलं, एका असामान्य व्यक्तिमत्वाने देशाला घडवले’, असं कॅप्शन देत धर्मेंद्र यांचं हे पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मॅडॉक फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे… (Dharmendra Movie)
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन
================================
दरम्यान, २०२३ मध्ये आलेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या फॅमेली ड्रामा चित्रपटात धर्मेंद्र झळकले होते… या वयातही तरुणांना लाजवेल असा अभिनय त्यांनी चित्रपटात केला होता… शिवाय शबाना आझमी (Shabana Azmi) आणि धर्मेंद्र यांचा या चित्रपटातील किसींग सीन विशेष गाजला होता… त्यानंतर ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ चित्रपटातही त्यांनी उत्तम काम केलं होतं.. ‘फिरसे यमला पगला दीवाना’, ‘सिंग साहेब’, ‘जॉनी गद्दार’, ‘अपने’, ‘मेट्रो’ अशा बऱ्याच चित्रपटात २००० च्या काळात झळकले होते…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi